माध्यमिक विद्यालय अडसरे बु. शाळेतील दहावीच्या विध्यार्थ्यांचा निरोप समारंभ
कवडदरा न्यूज नेटवर्क-
मनसे ग्रुप शाखा अडसरे बु.चे किरण साबळे, दत्तू आंबेकर,रतन भांगरे,गणेश भांगरे,हिरामण कुंदे,बळी साबळे यांच्याकडून दहावी च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना.
गुरुवार दि. 12 फेब्रुवारी 2026 रोजी आदिवासी विद्या प्रसारक संस्थेचे सर्वतीर्थ माध्यमिक विद्यालय अडसरे बु येथे इयत्ता दहावी च्या विध्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला.त्या प्रसंगी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी उपयुक्त शैक्षणिक साहित्य महाराष्ट्र नवनिर्माण सेना वीज कामगार संघटना सरचिटणीस रामनाथ साबळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा अडसरे बु ह्या ग्रुप ने प्रति विद्यार्थी परीक्षा पॅड,पेन, पेन्सिल,पट्टी व इत्यादी वस्तू भेटू देऊन त्यांना परीक्षेसाठी प्रोत्साहित करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते व मनसे ग्रुप चे किरण साबळे, दत्तू आंबेकर,रतन भांगरे,गणेश भांगरे,हिरामण कुंदे,बळी साबळे व इतरही पदाधिकारी उपस्थित होते.
शाळेतील मुख्याद्यापक व शिक्षक सर्वांनी पाहुण्यांचे आभार मानले.