पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने आईच्या नावे एक वृक्ष लावावा-आमदार मोनिका राजळे
पाथर्डी प्रतिनिधी:
सध्याच्या काळात वाढत्या जागतिक तापमान वाढीपासून मुक्तता मिळवणे आणि या पृथ्वीचे भविष्य सुरक्षित करणे या उद्देशाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ जून रोजी ‘एक पेड माँ के नाम’ हे अभियान सुरु केले आहे. शेवगाव- पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार मोनिका राजीव राजळे यांनी दादापाटील राजळे महाविद्यालयात आपल्या मातोश्री सौ. कुसूमताई अशोकराव पा. डोणगावकर यांच्या नावे एक वृक्ष लावून या अभियानाची सुरुवात केली. या प्रसंगी त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनी, शिक्षक तसेच मतदार संघातील सर्व कार्यकर्ते, नागरिक यांना आवाहन केले की, आपल्या आईबद्दल प्रेम आदर आणि सन्मानाचे प्रतीक म्हणून एक झाड त्यांनी लावावे व पृथ्वी मातेच्या रक्षणाची प्रतिज्ञा घ्यावी.
या वेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे यांच्या मातोश्री सौ. मोहिनी आप्पासाहेब राजळे यांच्या नावेही वृक्ष लावण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त सुभाषराव ताठे, कुशिनाथ बर्डे,राधाकिसन राजळे, सोपानराव तुपे, सचिन नेहुल,चारुदत्त वाघ,दिलीप कचरे, दादापाटील राजळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. टेमकर, कार्यालयीन अधिक्षक विक्रम राजळे, प्राचार्य सुनिल पानखडे, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक, विद्यार्थी विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.