महाराष्ट्र
36286
10
हत्राळ या ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी
By Admin
हत्राळ येथे शिवजयंती उत्साहात साजरी
पाथर्डी तालुका- पाथर्डी तालुक्यातील हत्राळ या ठिकाणी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ह.भ.प कृष्णा महाराज ताठे ,ह.भ.प अशोक महाराज केदार यांच्या शुभहस्ते महाआरती घेण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणुन आज आपल्या महाराष्ट्रात मंदिरे उभे आहेत आणि महाराज एक विचार आहे तो विचार आपल्याला पुढे घेऊन जाणे आवश्यक आहे छत्रपती शिवाजी विचार सपविण्यासाठी आज काल काही समाजकंठक पुढे येत आहेत परतु ते संपतील पण महाराजाचे कार्य ,विचार आचार हे पृथ्वी आहे तो पर्यत राहणार आहेत.तरुणानी आपला आदर्श हा छत्रपती शिवाजी महाराजानां ठेवल्यास अपयश येणार नाही शिवजयंती हि गावातच नाही तर प्रत्येक घरात व्हावी असे मत ह.भ.प कृष्णा महाराज ताठे यांनी व्यक्त केले. यावेळी आरती घेऊन मराठी शाळेचे विद्यार्थ्यांचे अतिशय सुंदर भाषणे तसेच छत्रपती शिवाजी महाराज वर आधारित नृत्याचा कार्यक्रम झाला त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.या कार्यक्रमासाठी हत्राळचे सरपंच दादा शिवनकर, उपसरपंच परमेश्वर टकले, सैदपूरचे उपसरपंच संभाजी केदार ,मा.सरपंच नामदेव काकडे,मा.उपरपंच सचिन पटारे,बाळासाहेब काकडे, अमोल कांकरीया,बाळासाहेब कोठुळे,
अंकुश टकले, रघुनाथ शिवणकर,नितीन काकडे, प्रवीण मडके, कानिफ पटारे, मारुती साळवे, दिगंबर केदार, संभाजी बडे, बाबासाहेब दराडे, आप्पा काकडे,सुर्यभान साळवे,श्रीकांत टकले,नवनाथ बळीद,रामभाऊ केदार, संभाजी गणेशकर,पवण शिवणकर शेषराव टकले सह शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक व विद्यार्थी,हत्राळ-सैदापुर ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच शिवजयंती उत्सव समितीचे तुषार टकले, ज्ञानेश्वर शिवणकर, रामेश्वर शिवणकर, संकेत गणेशकर,ओमकार शिवणकर,सोहम टकले,प्रविण टकले,बबन गणेशकर,कालिदास टकले,अशितोष टकले,विकास शिवणकर,बाबासाहेब टकले,सुरज शिवणकर आदि उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भडके सर यानी केले प्रस्तावित परमेश्वर टकले यांनी केले तर आभार दादा शिवनकर यांनी मानले.
रात्री गावातील काही ग्रामस्थानी डि.जे मिरवणुक होवु दिली नाही व मिरवणुकीत गोधळ घातला पुढील शिवजयंती होवु देणार नाहीत असे सागुण मिरवणुक बंद पाडली पोलिस प्रशासनाला बंदोबस्ताची मागणी करुन देखील बंदोबस्त न दिल्याने हा प्रकार घडला आहे -
परमेश्वर टकले -शिवजयंती उत्सव समिती
Tags :
36286
10




