श्री विवेकानंद विद्यामंदिर विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन विविध उपक्रमांनी साजरा
पाथर्डी प्रतिनिधी:
मराठी ज्येष्ठ कवी साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन याचे औचित्य साधून श्री विवेकानंद विद्यामंदिर पाथर्डी येथे संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड यांच्या संकल्पनेतून वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथदिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या ग्रंथदिंडीमध्ये विद्यालयातील ७३६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या ग्रंथदिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध फलकांतून वाचनाचे महत्त्व पटवून दिले तसेच विविध ग्रंथांचे पूजन यावेळी करण्यात आले. ग्रंथदिंडी, विविध संतांची वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी,झेंडे,फलक घेतलेले विद्यार्थी यामुळे विद्यालयातील वातावरण अतिशय उत्साही व आनंददायी बनले.
ग्रंथदिंडीचे उद्घाटन ग्रंथपाल प्रा.अशोक वैद्य, ग्रंथपाल प्रा. किरण गुलदगड,मुख्याध्यापक शरद मेढे,समन्वयक ज्ञानेश्वर गायके, ग्रंथपाल नंदकुमार झेंड, संपत घारे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
मराठी भाषा ही केवळ आपली मातृभाषा नसून ती आपली संस्कृती आणि ओळख आहे.आजच्या डिजिटल युगातही विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासावी या उद्देशाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यालयात गीत गायन स्पर्धा,प्रश्नमंजुषा स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. गीत गायन स्पर्धेत 35 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन कविता, पोवाडे,भारुडे, शेतकरी गीत, देशभक्ती गीत सादर केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर गायके यांनी केले.सूत्रसंचालन शितल आंधळे यांनी तर आभार गार्गी तरवडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेश्मा सातपुते, दादासाहेब उदमले,दीपक राठोड, शशांक महाजन,प्रमोद हंडाळ, अर्चना धायतडक, रत्नमाला सांगळे, अनिता केदार, जयश्री खोरदे, सुवर्णा ढाकणे, उषा आव्हाड,सतीश बोरुडे यांनी परिश्रम घेतले.