राज्यस्तरीय एकदिवसीय शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यशाळा इगतपुरी येथे संपन्न
By Admin
राज्यस्तरीय एकदिवसीय शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यशाळा इगतपुरी येथे संपन्न
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची उपस्थिती
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या व राज्यातील आदर्श शिक्षकांच्या उपस्थितीत इगतपुरी येथे एकदिवसीय शैक्षणिक विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेत दिवसभरात शिक्षण क्षेत्रातील विविध बदलांवर विविधांगी चर्चा झाली. सलग नऊ ते दहा तास ही कार्यशाळा सुरू होती. पूर्णवेळ शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे साहेब यांनी उपस्थित राहून शिक्षकांच्या प्रयोगशील उपक्रमांची माहिती जाणून घेतल्याने उपस्थित शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.
कार्यशाळेच्या सुरवातीला उपस्थित आदर्श शिक्षकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करत एकवेगळा पायंडा पाडत या बैठकीस मंत्री भुसे यांनी सुरवात केली. या कार्यशाळेसाठी राज्यभरातील आदर्श शिक्षकांचे ६ गट करण्यात आले होते प्रत्येक गटात ६ शिक्षक सहभागी होते. या शिक्षकांनी आपल्या शाळेत काय बदल केले, कुठले नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले याची माहिती मंत्री मा. भुसे यांनी पूर्णवेळ उपस्थित राहून जाणून घेतली. यावेळी आदर्श शिक्षकांनी देखील संशोधन व विचारविनिमय करून शिक्षण क्षेत्रात काय केले व येणाऱ्या काळात काय बदल अपेक्षित आहेत याबाबत आपली भूमिका मांडली.
राज्यातील विविध भागातून आलेल्या शिक्षकांनी राबविलेल्या उपक्रमांचे मंत्री भुसे यांनी कौतुक केले. शिक्षक हे शिक्षण व्यवस्थेचे खरे शिलेदार असल्याचे गौवोद्गार भुसे यांनी केले. आपल्या ज्ञानाचे आदान प्रदान करा आपल्या जिल्ह्यात राबविलेले उपक्रम इतर जिल्ह्यात पोहचवा जेणेकरून शिक्षण क्षेत्रात क्रांती करून विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी मदत होणार असल्याचे भुसे यावेळी म्हणाले. शाळा भेटी राज्यभर होणार असून या भेटी चूक काढण्यासाठी नव्हे तर सुधारणा करण्यासाठी असल्याची ग्वाही मंत्री भुसे यांनी यावेळी दिले.
भुसे पुढे म्हणाले की येणाऱ्या काळात राष्ट्रीय शिक्षण धोरण अमलात आणायचे आहे. यामुळे आपल्या विभागाची वाटचाल सुरू आहे. शिक्षण विभागाचे दैवत हे विद्यार्थी असून त्यांना घडविण्यासाठी मेहनत घेणे महत्वाचे आहे. या पिढीला घडविण्यासाठी मेहनत घेणाऱ्या शिक्षकांच्या प्रतिनिधी समवेत आज सकारात्मक चर्चा झाली. शिक्षकांचे मार्गदर्शन या विभागात काम करताना महत्वाचे ठरणार असून मी पदभार घेतल्या नंतर शैक्षणिक साक्षरता होण्यासाठी प्रयत्नशील आहे. शिक्षकांच्या अडी अडचणी तसेच त्यांनी केलेलं कार्य आज जाणून घेतले. पदभार स्वीकारल्यानंतर शिक्षक संघटना तसेच संस्थाचालक व विभागनुसार शिक्षण विभागाची बैठक घेत असल्याचे मंत्री भुसे म्हणाले.
येणाऱ्या काळात शिक्षकांचे बाहेरील कामे 50 टक्के कमी करणार असल्याचे देखील भुसे म्हणाले तसेच सर्व शालेय समिती एकत्रित करून एक समिती करण्याचे विचाराधीन असल्याचे देखील म्हणाले. येणाऱ्या काळात इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांची रांग मराठी शाळेत लागेल असे काम करा असे आवाहन मंत्री भुसे यांनी उपस्थित शिक्षकांना केले.
या बैठकीतून चांगेल मुद्दे समोर येत आहेत. नवीन शिक्षण धोरण स्वीकारत असताना या सर्व बाबींचा समावेश केला जाईल. चांगले काम करणाऱ्या शिक्षकांच्या पाठीशी शिक्षण विभाग ठामपणे उभे राहील असे यावेळी भुसे म्हणाले. मराठी शाळा ही सक्षम झाली पाहिजे गुणवत्ता पूर्ण शिक्षण दिले तर शाळेची संख्या दुपट्ट होईल आपण प्रयोगशील रहा आपली दखल विभाग नक्की घेईल असे भुसे यावेळी म्हणाले.
कार्यशाळेत मुख्यत्वे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीत शैक्षणिकसह भौतिक सुविधा महत्वाची भूमिका पार पाडत असून त्यामध्ये शाळेत विद्यार्थी संखेच्या प्रमाणात आकर्षक वर्गखोल्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मुला मुलींसाठी त्यांच्या प्रमाणात स्वतंत्र स्वच्छतागृह, आकर्षक शालेय परिसर, प्रयोगशाळा इत्यादींचा समावेश होता. अनेक शाळा या लोकसहभागातून चांगल्या स्थितीत आहेत तर बौद्धिक दृष्ट्या शिक्षकांनी जबाबदारी घेत पिढी घडविण्याचे काम महाराष्ट्र केले आहे. यावेळी मंत्री महोदय व उपस्थित अधिकाऱ्यांनी या सर्व बाबींचा आढावा घेत सूचना समजून घेतल्या.
या कार्यशाळेसाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री . दादाजी भुसे, प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग, रनजित सिंह देओल, सचिंद्र प्रताप सिंह आयुक्त. श्रीमती आर विमला, राज्य प्रकल्प संचालक, संचालक राहुल रेखावार, श्रीमती अशिमा मित्तल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, संपत सूर्यवंशी शिक्षण संचालक, महेश पालकर, कृष्णकुमार पाटील, तुषार महाजन ,. गोविंद कांबळे , . रमाकांत काठमोरे रामदास धुमाळ, कक्ष अधिकारी शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आदी मान्यवर उपस्थित होते.
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/like.png)
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/chat.png)