महाराष्ट्र
349008
10
घरफोडी करणारे दोघे जेरबंद
By Admin
घरफोडी करणारे दोघे जेरबंद
चोरी व घरफोडी करणाऱ्या दोघांसह पोलीस पथक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राहुरी : चोरी व घरफोडी
करणाऱ्याला दोघांना जेरबंद पथकाला यश आले आहे. पोलिसांनी दिग्रस व राहुरी येथून मुद्देमाल हस्तगत करून आरोपीकडून पोलीस कोठडीत दोन गुन्हे उघडकीस आणले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, येथील पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला होता. पोलिसांनी दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपीची गोपनीय बातमीदारा मार्फत पोलीस निरीक्षक यांना माहिती मिळाल्याने सदर गोपनीय माहितीच्या आधारे संशयित अतिश नारायण धोत्रे (वय २०) व जय विश्वास हिवाळे (वय १९, रा. मुलंनमाथा,
राहुरी पोलिसांची कारवाई
ता. राहुरी) यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता, सदर आरोपींनी नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी त्यांना नुकतीच अटक केली असून, रिमांड कालावधीमध्ये चोरीस गेलेल्या तीस हजार रुपये किंमतीच्या कलरच्या बकेट दिग्रस व राहुरी येथून हस्तगत करून, गुन्ह्यात वापरलेली आरोपीच्या नावावर असलेली बजाज पल्सर मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. तसेच सदर आरोपींनी पोलीस कस्टडी दरम्यान राहुरी पोलीस स्टेशनला मोबाईल चोरीचा दाखल गुन्हा केल्याची
कबुली दिलेली याबाबत
पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संदिप ठाणगे करीत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय आर. ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली, सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदिप ठाणगे, विजय नवले, पोलीस कॉन्स्टेबल जयदीप बडे, नदीम शेख, आजिनाथ पाखरे, अमोल भांड, शेषराव कुटे यांनी केलेली आहे.
Tags :
349008
10





