महाराष्ट्र
७०० किलो गोमांस पकडले : पाच आरोपींवर कारवाई
By Admin
७०० किलो गोमांस पकडले : पाच आरोपींवर कारवाई
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शिर्डी शहरातील कालिकानगर बाजारतळ परिसरातील जुन्या मटन मार्केटमध्ये विक्रीसाठी आणलेले सुमारे १ लाख ४० हजार रुपये किंमतीचे ७०० किलो गोमांस, दोन मोटारसायकली आणि मोबाईलसह एकूण सुमारे २ लाख ६० हजारांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती अशी, की मंगळवार ३ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास कालिकानगर बाजारतळ परिसरातील जुन्या मटन मार्केटमध्ये, नागरी वस्तीच्या ठिकाणी गोवंशाच्या गोमांसाची खुलेआम विक्री सुरू असल्याची
माहिती बजरंग दल गोरक्षक दल, राहाता प्रखंड यांना मिळाली. स्थानिक नागरिकांनाही ही बाब माहिती होती, परंतु कोणीही आवाज उठवत नव्हते. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ही माहिती पोलिसांना कळवताच पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. छाप्यात सुमारे ७०० किलो गोवंशीय जनावरांचे गोमांस आढळून आले. राज्यात गोवंश जनावरांची कत्तल करण्यास बंदी असताना मेहबूब शेरखान कुरेशी (वय ४५, रा. कोपरगाव), सादिक लालू कुरेशी (वय ४५, रा. ममदापूर), समीर आरिफ कुरेशी (वय २१, रा. कोपरगाव), सोहेल आयोग कुरेशी (वय २७, रा. कोपरगाव) आणि मुस्ताक रफिक कुरेशी (वय २०, रा. ममदापूर)
या आरोपींनी संगनमताने गोवंशीय जनावरांची कत्तल करून विक्री केली असल्याचे समोर आले.
शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद सुभाष सूर्यवंशी (वय २६) यांनी या आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शिर्डी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल राजपूत, जराड, सूर्यवंशी, झरेकर आणि इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. छाप्याच्या वेळी परिसरात मोठी गर्दी जमली होती. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Tags :
93502
10