इगतपुरी तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची 29 वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
नाशिक प्रतिनिधी
इगतपुरी तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची 29 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत संस्थेचे चेअरमन श्री. नारायण केरू लोहरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर सभेमध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापक, मुख्यध्यापक पदोन्नती मिळालेले मुख्याध्यापक, शिक्षकांचे गुणवंत पाल्य शिक्षण,क्रीडा, स्पर्धा परीक्षेत मिळालेले यश. या पाल्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री गोरखनाथ तारडे यांनी केले.सदर सभेमध्ये वेगवेगळ्या विषयावर साधक बांधक चर्चा करण्यात आली . सदर सभेमध्ये सर्व मान्यवरानी सर्व संचालक मंडळाचे कामाचे कौतुक करण्यात आले पतसंस्थेची वाटचाल योग्य दिशेने चालू असल्याचे सांगितले. सदर सभेस श्री. निवृत्ती तळपाडे मामा श्री. काशिनाथ भोईर श्री. ज्ञानेश्वर भोईर सर श्री. मारुती कुंदे यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन श्री. नारायण लोहरे यांनी अहवाल वर्षात पतसंस्थेस विक्रमी नफा झाल्याचे सांगितले या पुढील वर्षात जास्तीत जास्त सभासद वाढवून व वेळेवर कर्जाचे हप्ते देऊन पतसंस्थेस सहकार्य करावे अशी विनंती सभासदास करण्यास आली. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन श्री. राजाराम इदे यांनी केले सदर सभेसाठी पतसंस्थेचे व्हा. चेअरमन संतोष शिरसाठ सचिव श्रीमती. सुगंधा कोरडे,संचालक मंडळ . श्री. तुकाराम सारुक्ते, श्री. जनार्दन करवंदे, श्रीमती. शिला गातवे,श्री. दत्ता साबळे,श्री. नामदेव साबळे, श्री. गोरखनाथ तारडे, श्री. देविदास हिंदोळे, श्रीमती. मंजुषा सानप. या सर्व संचालक मंडळाने सभा यशस्वी होणेकामी खूप मेहनत घेतली. त्याचबरोबर सर्व सभासद बांधव उपस्थित होते. सभा ही अगदी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.श्री दत्ता साबळे सर यांनी सर्व सभासद व मान्यवरांचे आभार मानले.