महाराष्ट्र
99668
10
पदवीधर शिक्षक नसल्याने ग्रामस्थांकडून शाळेला टाळे
By Admin
पदवीधर शिक्षक नसल्याने ग्रामस्थांकडून शाळेला टाळे
पाथर्डी- प्रतिनिधी
गेल्या तीन महिन्यापासून शाळेला पदवीधर शिक्षक नसल्यामुळे मागील आठ दिवसापूर्वीच निवेदनाद्वारे गटशिक्षणाधिकारी पाथर्डी यांना निवेदना द्वारे कळविण्यात आले होते.परंतु सदर निवेदनाची शिक्षण विभागाकडुन कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही किंवा पत्र व्यवहार केला नाही.त्यामुळे आठ दिवसाने ठरल्याप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हत्राळ - सैदापुर शाळेला टाळे ठोकले.
विद्यार्थ्यांचे नुकसान होवु नये म्हणून व मुख्याध्यापक श्री.बटुळे यांनी केलेल्या विनतींला ग्रामस्थांनी मान देवुन अखेर दुपार नंतर शाळा पुन्हा सुरु करण्यात आली. २० ऑगस्ट २०२४ पर्यंत शिक्षक हजर न झाल्यास सर्व विद्यार्थ्याना घेवुन पंचायत समिती (शिक्षण विभाग ) या ठिकाणी उपोषण करण्यात येईल,असाही इशारा देण्यात आला.
यावेळी हत्राळचे सरपंच दादा शिवणकर, सैदापुरचे सरपंच विष्णु केदार,शाळा कमिटी अध्यक्ष बाबासाहेब दराडे, ग्रामपंचायत सदस्य संभाजी केदार, अकुंश टकले,माजी उपसरपंच सचिन पटारे,संभाजी बडे, राहुल केदार,गणपत क्षिरसागर, सुभाष पटारे, शाळेचे मुख्याध्यापक बटुळे, श्री.गायकवाड, सौ.लाटने, सौ.खेडकर आदी शिक्षक व शिक्षिका, ग्रामस्थ व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
शिक्षण विभागाचे जि.प. शाळेकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. पाथर्डी तालुक्यांमध्ये गणवेशामध्ये झालेला घोटाळा व पाथर्डी तालुक्यात कित्येक शाळांना नसलेले शिक्षक, वेळेवर न येणारे शिक्षक अशा अनेक समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्या देखील कमी होत आहे.जिल्हा परीषदेचे या गोष्टीकडे लक्ष नाही,हे यातुन समजते. शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्याचे होत असलेले नुकसान याचे यांना काही देणेघेणे नाही. आठ दिवसात कुठल्याही प्रकारचे लेखी किंवा तोंडी स्वरुपाची जर दखल घेतली जात नसेल तर जिल्हा परीषद शाळांचे भविष्य अंधारात आहे.
-परमेश्वर टकले
Tags :

