इगतपुरी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धाला सुरूवात
नाशिक - प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर काॕलेज कवडदरा येथील शालेय मैदानावर नाशिक क्रिडा विभाग कार्यालय मार्फत घेण्यात येणाऱ्या इगतपुरी तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेला उत्साहात सुरूवात झाली आहे.
या तालुकास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य व्ही.एम.कांबळे सर यांच्या हस्ते झाले.यावेळी तालुका क्रिडा प्रमुख विजय सोनवणे सर तसेच तालुक्यातील माध्यमिक शांळाचे सर्व क्रिडा शिक्षक व विद्यार्थी खेळाडू तसेच प्रशिक्षक तसेच शिक्षक यावेळी उपस्थित होते.
स्पर्धा अनुक्रमे दि.३,४,६ सप्टेंबर या कालावधी दरम्यान होत आहे.
तालुकास्तरीय १४ वर्ष,१७ वर्षे,१९ वर्ष मुले व मुली यांच्या १०० धावणे,२०० मी.,४०० मी.,८०० मी.तसेच २०० मी.,४०० मी. रिले स्पर्धा
गोळा फेक,थाळी फेक,उंच उडी या स्पर्धा होत आहे.