महाराष्ट्र
203742
10
महाराष्ट्रात बिबट्यांची संख्या अचानक का वाढली? वनमंत्र्यांनी सांगितलं
By Admin
महाराष्ट्रात बिबट्यांची संख्या अचानक का वाढली? वनमंत्र्यांनी सांगितलं कारण, म्हणाले...; 'पूर्वी बिबट्या वन्यजीव...'
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
महाराष्ट्रामध्ये बिबट्यांची संख्या अचानक का वाढली आहे?
वनमंत्री गणेश नाईक यांच्या मते, बिबट्या आता उसाचा जीव झाला आहे. याचा अर्थउसाच्याशेतातत्यांचीपैदासझाल्यामुळेआणिउसाचेक्षेत्रवाढल्यामुळेत्यांचीसंख्यावाढलीआहे.
बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने कोणता उपाय प्रस्तावित केला आहे?
सरकारने बिबट्याला वन्यजीवकायद्याच्याशेड्युलएक (Schedule I) मधून काढून शेड्युल दोन (Schedule II) मध्ये टाकण्याचा प्रस्ताव वनविभागाला पाठवला आहे.
बिबट्यांची नसबंदी (Sterilization) करण्याची परवानगी मिळाली आहे का?
होय, केंद्राच्या वन विभागाकडूनकमीप्रमाणातनसबंदीकरण्याचीपरवानगीमिळालीआहे.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा धुमाकुळ वाढत चालला आहे. पुण्यातील जुन्नर, नाशिक, नागपूर,अहिल्यानगर या भागात बिबट्यांच्या हल्लातदेखील वाढ झाली आहे. महाराष्ट्रात अचानक बिबट्यांची संख्या का वाढली ? याचे उत्तर थेट वनमंत्री गणेश नाईक यांनी दिलं आहे.
गणेश नाईक यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, पूर्वी बिबट्या हा वन्यजीव होता. आता तो वन्यजीव नसून उसाचा जीव झाला आहे. म्हणजे उसाच्या शेतात त्यांची पैदास झाली आणि त्यामुळं त्यांची वाढ झाली. बिबट्यांची संख्या वाढली आहे त्याचे कारण म्हणजे उसाचे क्षेत्र वाढले आहे त्यात जन्मलेले बिबट यांची संख्याही वाढली आहे.
पुढे ते म्हणाले की, बिबट्या हा प्राणी शेड्युल एकमध्ये येतो. आता तो शेड्युल 2मध्ये करण्याचा प्रस्ताव आम्ही वनविभागाला पाठवला आहे. वन नसेल तिथे बिबटे आढळत असतील तर त्याची गणना वन्यजीवमध्येकरु नका अशी भूमिका आम्ही घेतली आहे. परंतु, केंद्राच्या वन विभागाकडून बिबट्यांची नसबंदी करण्याची परवानगी मिळाली आहे पण ती फार कमी प्रमाणात आहे.
नागपूरच्या पारडी भागात बिबट्या शिरल्याची घटना घडली आहे. शिवनगर परिसरातील एका घरात हा बिबट्या शिरलाय या बिबट्यानं काही नागरिकांवर हल्ला करुन त्यांना जखमी केल्याची माहिती आहे. यावरही गणेश नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरात लोकांना सावध करणारी यंत्रणा राबवली जाईल आणि या भागातील बिबट दूर जंगलात जातील याची काळजी घेतली जाईल, असं ते म्हणाले.
विविध राज्यांमध्ये अशीच समस्या निर्माण झाली आहे केंद्र आणि राज्य मिळून याबद्दल काम करत आहे. आणखी बिबट या भागात असू शकतात त्या अनुषंगाने वनविभागाचे अधिकारी सतर्क आहे अन्य विभागांची मदत घेतली जाईल अशी घटना घडणार नाही जनसामान्यावर हल्ला होणार नाहीत याची काळजी घेतली जाईल, असंही गणेश नाईक यांनी म्हटलं आहे.
आजचे आज रेस्क्यू टीमला पूर्ण आवश्यक आयुध आणि यंत्रणा देण्याचे आदेश देतो. तुम्ही जसे सांगत आहे रेस्क्यू टीम खरोखर उशिरा पोहोचली असेल, तर त्याची माहिती घेतो, भविष्यात रेस्क्यू टीम वेळेत पोहोचेल यासाठी काळजी घेऊ. जखमींचा संपूर्ण उपचार खर्च सरकार करेल.. मजुरांचा रोजगार बिबट दहशतीमुळे बुडत असेल, तर त्या संदर्भात त्यांनाही नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करू, असंही त्यांनी अश्वस्त केले आहे.
Tags :
203742
10





