महाराष्ट्र
सेवानगर जि. प. प्रा. शाळा शालेय परसबाग स्पर्धेत तालुक्यात
By Admin
सेवानगर जि. प. प्रा. शाळा शालेय परसबाग स्पर्धेत तालुक्यात प्रथम
तालुक्यातील २८७ जि. प. प्रा. शाळेचा स्पर्धेत सहभाग
पाथर्डी प्रतिनिधी:
अहिल्यानगर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग मार्फत नुकत्याच शालेय परसबाग स्पर्धा घेण्यात आल्या. सदर स्पर्धेमध्ये तालुक्यातील २८७ जि. प. प्रा. शाळांनी स्पर्धेत सहभाग घेतला.पाथर्डी तालुक्यातील प्रत्येक केंद्रातील शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या.या स्पर्धेत पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव केंद्रातील तोंडोळी अंतर्गत असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सेवानगर शाळेने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत उत्कृष्ट परसबाग स्पर्धेमध्ये पाथर्डी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सेवानगर शाळा अतिशय डोंगराळ माळरानावर असून मुख्याध्यापक बाळासाहेब गोल्हार यांनी मेहनत घेऊन माळरानावर कमी पाणी असून पानाफुलांची परसबाग फुलवली.सध्या ही शाळा सुंदर परसबाग असणारी शाळा म्हणून ओळख झाली आहे .शाळेत मुख्याध्यापक बाळासाहेब गोल्हार आणि दादासाहेब दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले जात आहेत.मागील वर्षी प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळेमध्ये परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरिता परसबाग स्पर्धेत या शाळेने तालुकास्तर गतवर्षी द्वितीय क्रमांक मिळवला होता. मात्र यावर्षी प्रथम क्रमांक पटकावला आहे. यामध्ये मल्चिंग पेपरचा वापर ठिबक सिंचन करून आंबा, नारळ, फणस, शेवगा, कडीपत्ता व भोपळा कांदा, मिरची, टोमॅटो, वांगी इत्यादी २१ प्रकारच्या फळभाज्या व पालेभाज्याचा समावेश आहे.
प्रगतशील युवा शेतकरी विदेश राठोड व प्रवीण राठोड तसेच सुरेश जाधव उद्योजक तिलोक चव्हाण, सुरेश चव्हाण सेवालाल मित्र मंडळ यांनी मल्चिंग पेपर देऊन टाकण्यासाठी मदत केली. ठिबक सिंचन खेडकर रामेश्वर सिव्हिल इंजिनिअर यांनी शाळेला दिला. सुट्टीच्या दिवशी किंवा शाळेच्या इतरत्र वेळेत परसबागेची काळजी महादेव भाऊ वारंगुळे(वन विभाग सेवानिवृत्त) यांचे खूप मोलाचे मार्गदर्शन आहे. सदर परसबाग मध्ये तयार झालेल्या ताज्या भाजीपाल्याचा वापर नियमित शालेय पोषण आहारामध्ये करून उत्कृष्ट आहार शाळेत दिला जातो.
या यशाबद्दल पाथर्डी तालुक्याचे शालेय पोषण आहार अधीक्षक रामनाथ कराड, कोरडगाव केंद्राचे केंद्रप्रमुख दगडू महांडुळे, रामदास बाबागोसावी, बाळासाहेब वामन, संतोष कुसळकर पोषण आहार, विषय तज्ञ रवि डालिंबकर,
विष्णू आंधळे मुख्याध्यापक तोंडोळी व भास्कर बारगजे विषय तज्ज्ञ, अशोक खेडकर, दिलीप फुंदे,कराळे झिरपे व सर्व ग्रामस्थ तोंडोळी सेवा नगर आदींनी अभिनंदन केले.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे १० जून २०२४ चे शासन निर्णयानुसार प्रत्येक शाळेत परसबाग विकसित करून परसबागेतील ताज्या भाजीपाला पोषण आहार मध्ये देउन आहार चे पोषणमूल्य वाढविण्याबाबत आदेशित केले.होते.शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या प्रोत्साहनामुळे तालुक्यात अनेक उत्कृष्ठ परसबाग तयार झाल्या असून परसबाग मधील ताज्या भाजीपाल्याचा वापर पोषण आहारामध्ये होत आहे
-- रामनाथ कराड, अधिक्षक शालेय पोषण आहार, प. स. पाथर्डी.
Tags :
6200
10