महाराष्ट्र
36963
10
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सिन्नरच्या भव्य शोभायात्रेत नवजीवन स्कूलचा सहभाग
By Admin
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सिन्नरच्या भव्य शोभायात्रेत नवजीवन स्कूलचा सहभाग; ढोल ताशांचा गजर पारंपारिक वेशभूषा आणि भगवेमय वातावरणात मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत
सिन्नर तालुका प्रतिनिधी- सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गुढीपाडव्याच्या निमित्ताने सिन्नर शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते पारंपारिक सोहळ्याने आणि उत्साहात सहभागाने ही शोभायात्रा सिन्नरकरांचे विशेष आकर्षण ठरले छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी सात वाजता चाळीस फूट उंच गुढी उभारून शोभा यात्रेला सुरुवात झाली सिन्नर शहराचे नगराध्यक्ष श्री विठ्ठलराजे उगले उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख शाळेच्या प्राचार्य सौ अनिता सूर्यवंशी मॅडम, श्री नरेंद्र वाघ सर ,व शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गुढीची विधिवत पूजा करण्यात आली शोभायात्रेत नवजीवन शाळेचे शिक्षक श्री प्रशांत साळी सर यांनी सादर केलेली श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा शोभा यात्रेचे प्रमुख आकर्षण होते या शोभायात्रेत नवजीवन डे स्कूलचे क्रीडा शिक्षक श्री अमर बैरागी सर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट लाठीकाठी चे प्रात्यक्षिक सादरीकरण केले यामध्ये 25 विद्यार्थी सहभागी होते नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले यांनी ही नवजीवन च्या विद्यार्थ्यांसोबत लाठी काठी मर्दानी खेळ खेळला . तसेच या शोभायात्रेत रंगकर्मी श्री संजय गंगावणे यांनी कानिफनाथ यांची वेशभूषेचे विशेष आकर्षण होते पारंपारिक श्री गणेश पालखी ,ढोल ताशांचा गजर, लेझीम पथक, स्कूटर रॅली, राम सीता चित्ररथ ,झांज पथक, भजनी मंडळ, शहरातील अनेक सामाजिक संघटनांनी यामध्ये सहभाग नोंदवला शोभायात्रेच्या शेवटी नर्मदा लॉन्स येथे सांगता होऊन सहभागी विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह श्री उदय सांगळे नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले सिन्नर सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत उपाध्यक्ष प्राध्यापक राजाराम मुंगसे सर यांच्या हस्ते देण्यात आले या रॅलीमध्ये शाळेचे क्रीडा शिक्षक जितेंद्र शिंदे ,शरद शिंदे, उपस्थित होते या रॅलीचे सूत्रसंचालन प्राध्यापक जावेद शेख यांनी केले
Tags :
36963
10




