Ahmednagar- नगरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे मिळाला आॕक्सीजन; दोन टँकर सुखरुप पोहचरले
By Admin
Ahmednagar- नगरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे मिळाला ऑक्सिजन; दोन टँकर सुखरुप पोहचले
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 22 एप्रिल 2021
नगरला येणारे ऑक्सिजनचे टँकर मध्येच रस्त्यात अडवले गेल्याने नगरला ऑक्सिजन मिळण्याची शक्यता कमी होती. पण प्रत्यक्ष मुख्यमं...
अहमदनगर/प्रतिनिधी- नगरला येणारे ऑक्सिजनचे टँकर मध्येच रस्त्यात अडवले गेल्याने नगरला ऑक्सिजन मिळण्याची शक्यता कमी होती. पण प्रत्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच यात लक्ष घातल्याने व नगरचे ऑक्सिजन टँकर तातडीने नगरला रवाना करण्याच्या सूचना दिल्याने अखेर पोलिस बंदोबस्तात मंगळवारी सायंकाळी दोन टँकर नगरला सुख़रूप पोहोचले.
मंगळवारी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन मिळू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
शहरातील सर्व डॉक्टरांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेतली होती. मात्र, ऑक्सिजन जर संपला तर करायचे काय हा पेच निर्माण झाला होता. नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रात्रीतून फोन केल्यानंतर नगर शहरासाठी दोन टँकर उपलब्ध झाल्यामुळे अनेकांना त्याचा दिलासा मिळाला. त्यानंतर खासदार डॉ. विखे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे आभार मानले.
गेल्या आठवडाभरापासून नगर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. जिल्हा रुग्णालयांमध्ये आवश्यक तेवढा औषधाचा साठा व ऑक्सिजन साठा उपलब्ध होता. नगर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा अचानकपणे कमी झाला व सर्व रुग्णालये हतबल झाली. आयएमए संघटना व विविध डॉक्टरांनी एकत्रितपणे येऊन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांची भेट घेऊन त्यांना याबाबतची सर्व परिस्थिति सांगितली व प्रशासनानेसुद्धा ऑक्सिजन कशा पद्धतीने मिळवता येईल यासाठी प्रयत्न
सुरू केल्याचे डॉ. भोसले यांनी त्यांना सांगितले. मंगळवारी केवळ एक दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजन साठा नगर जिल्ह्यामध्ये होता. ज्या रुग्णालयात ऑक्सिजन संपले होते, त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयातून ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला होता. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला. वरिष्ठ पातळीवरून ऑक्सिजनची गरज पूर्ण व्हावी या उद्देशाने प्रशासनासह लोकप्रतिनिधीही राज्य सरकारच्या संपर्कामध्ये होते.
उद्योजकही आले पुढे
नगर जिल्ह्यात साधारणतः 60 ते 70 टन ऑक्सिजन सध्या लागत आहे. पण, अवघा दहा ते पंधरा टन साठा शिल्लक राहिल्यामुळे पेच निर्माण झाला होता. जे रुग्ण उपचार घेत होते, त्यांना दुसरीकडे हलवण्यासाठी धावपळ सुरू होती. अनेक नातेवाईकांनी जिल्हाधिकारी भोसले यांच्याकडे तक्रारी करून त्यांचे लक्ष वेधले होते. यावेळी भोसले यांनी स्वतः संबंधित रुग्णालयांमध्ये थेट संपर्क करून परिस्थिती नेमकी कशी आहे याची विचारणा केली व ऑक्सिजन जर संपलेला असेल तर तुम्हाला उपलब्ध करून देतो, असे आश्वासनही दिले होते. त्यानुसार मंगळवारी रात्री जिल्हा रुग्णालयातून काही रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवला गेला. विशेष
म्हणजे अनेक उद्योजक सुद्धा पुढे आले होते. नगर जिल्ह्यातील काही उद्योजकांनी ऑक्सिजनच्या दहा ते पंधरा टाक्या त्वरित रुग्णालयांना पुरवल्या होत्या त्यामुळे अनेकांना तात्काळ उपचार मिळू शकले.
नगर शहरातील कोरोना सेंटरमध्ये ऑक्सिजन पुरवठा कमी-अधिक प्रमाणात सुरू होता. अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन नसल्यामुळे अखेरीला मंगळवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी खासदार डॉ. सुजय विखे यांनी संपर्क करून त्यांना नगर जिल्ह्यातील ऑक्सिजन तुटवड्याविषयी माहिती दिली व तात्काळ ऑक्सिजनची व्यवस्था करा, अशी मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी नगर जिल्ह्यासाठी पुणे जिल्ह्यातून दोन टँकर पाठवले. पोलीस बंदोबस्तामध्ये हे टँकर नगर जिल्ह्यामध्ये दाखल झाले व तात्काळ हॉस्पिटलला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा त्यामधून मिळाला व रुग्णालयांचे काम सुद्धा रात्रीतून सुरळीत सुरू झाले.