महाराष्ट्र
29510
10
Ajit Pawar Birth Anniversary राज्य सरकारचा मोठा निर्णय
By Admin
Ajit Pawar Birth Anniversary राज्य सरकारचा मोठा निर्णय! मंत्रालयापासून शाळा-कॉलेजपर्यंत सर्वत्र होणार अजितदादांची जयंती
नगर सिटीझन न्यूज नेटवर्क
महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या तडाखेबंद कार्यपद्धतीसाठी आणि प्रशासनावरील जरबेसाठी ओळखले जाणारे 'दादा' म्हणजेच राज्याचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या राजकीय प्रवासाला आता थेट ऐतिहासिक आणि शासकीय मान्यता मिळाली आहे.
सन २०२६ मधील राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत शासकीय जयंती कार्यक्रमांच्या यादीत आता स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज, १५ जुलै २०२६ रोजी या संदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना एक लेखी निवेदन दिले होते. अजितदादांचे महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि पायाभूत विकासातील योगदान अद्वितीय आहे. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस (२२ जुलै) हा शासकीय जयंती कार्यक्रमांच्या सूचीमध्ये समाविष्ट करावा, अशी आग्रही मागणी या दोन्ही ज्येष्ठ मंत्र्यांनी केली होती.
मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ प्रशासनाला निर्देश दिले आणि सामान्य प्रशासन विभागाने आज अधिकृत सुधारित परिपत्रक जारी करून त्यावर शिक्कामोर्तब केले.
मंत्रालयापासून शाळा-महाविद्यालयांपर्यंत 'अभिवादन'
भाषण आदेशानुसार आता अजित पवार यांची जयंती २२ जुलै २०२६ रोजी राज्यभरात अधिकृतपणे साजरी केली जाणार आहे. मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, महाविद्यालये आणि शाळांमध्ये अजितदादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना शासकीय मानवंदना दिली जाईल.
विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय यंत्रणांमध्ये या कार्यक्रमाचे योग्य नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. उप सचिव हेमंत महाजन यांच्या स्वाक्षरीने हा आदेश जारी करण्यात आला आहे.
Tags :
29510
10




