महाराष्ट्र
243
10
मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी आक्रमक भुमिका घेणार - डाॕ.कृषिराज टकले पाटील
By Admin
मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी आक्रमक भुमिका घेणार - डाॕ.कृषिराज टकले पाटील
दसरा सणानिम्मित केली भुमिका स्पष्ट
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ कृषिराज टकले यांचा परिचय
डॉक्टर कृषिराज टकले यांची वयाच्या तेविसाव्या वर्षापासून मराठा चळवळीमध्ये मोठे योगदान आहे अखिल भारतीय मराठा महासंघाचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी सुरुवातीला जबाबदारी स्वीकारली श्रीरामपूर तालुक्यामध्ये मराठा आरक्षणाविषयी जनजागृती शाखा बैठका आंदोलने मेळावे अशा माध्यमातून समाज जागृतीचा प्रयत्न त्यांनी त्यावेळी केला त्यानंतर क्रांती सेनेच्या संस्थापिका डॉक्टर शालिनीताई पाटील यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी क्रांती सेनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष पद स्वीकारले आणि क्रांतीसेनेचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला क्रांती सेनेची मोठी जाहीर सभा श्रीरामपुर शहरांमध्ये डॉक्टर शालिनीताई पाटील व अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी त्यावेळी घेतली होती या सभेच्या माध्यमातून डॉक्टर कृषिराज टकले मोठ्या आक्रमकपणे पुढे आले मराठा समाजाच्या प्रश्नावर प्रत्येक तरुण जागा झाला पाहिजे यासाठी त्यांची वेगळी तळमळ असते डॉक्टर टकले यांचे मत आहे की तळागाळातील मराठा समाज एकत्र आला पाहिजे यासाठी स्वतःचे व्यासपीठ असणे महत्त्वाचे आहे त्यामुळे त्यांनी अखिल भारतीय मराठा सेवा संघ प्रदेशाध्यक्ष व शिव संग्राम राज्य सरचिटणीस युवक या पदांचा राजीनामा देऊन 6 जून 2020 रोजी स्वाभिमानी मराठा महासंघ ही संघटना कै अण्णासाहेब पाटील यांच्या विचारांनी प्रेरित होऊन स्थापन केली या माध्यमातून एक अराजकीय चळवळ उभी करण्याचा प्रयत्न संघटनेचे कार्यकर्ते करत आहेत डॉक्टर टकले यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न वर सुद्धा कायम आवाज उठवला आहे आणि वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांची मंत्र्यांची भेट घेऊन शेतकरी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केलेला आहे डॉक्टर टकले यांच्यामध्ये तळागाळातील कार्यकर्ता मोठा करण्याची कुवत आहे त्यामुळे आज दसऱ्यानिमित्त स्वाभिमानी मराठा महासंघाचे विचार संकल्पना पूर्ण होण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळावे व मराठा समाजाचे प्रश्न सुटावेत तसेच येत्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आक्रमक भुमिका घेणार असल्याचे डाॕ.कृषिराज टकले यांनी दसरा सणाच्या दिवशी आपली भुमिका स्पष्ट केली आहे.
शिवश्री अंकुश डांभे पाटील
अहमदनगर जिल्हा अध्यक्ष स्वाभिमानी मराठा महासंघ यावेळी उपस्थित होते.
आज दसऱ्यानिमित्त डाॕ.कृषिराज टकले यांनी स्वाभिमानी मराठा महासंघाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
Tags :

