पाथर्डी- प्रत्येकाचे लसीकरण होणे महत्त्वाचे यांनी केली मागणी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी: ‘लसीकरणाबाबत जिल्ह्यात पाथर्डी खूप मागे असून प्रत्येकाचे लसीकरण व्हावे, यासाठी ॲड. प्रतिक खेडकर यांच्या प्रमाणे शहरातील प्रत्येक वार्डात आणि गावात लसीकरण केद्र उभारून नियोजन करणे व सर्वांना लस देणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन खासदार डॉ सुजय विखे यांनी केले.
जगदंब युवा प्रतिष्ठानच्या वतीने मिशन कवच कुंडल लसीकरण नावनोंदणी सप्ताह योजनेचा प्रारंभ विखे यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, अजय रक्ताटे, विवेक देशमुख, लाला शेख, राजेंद्र नांगरे, उपजिल्हा रुग्णालयाच्या लसीकरण विभाग प्रमुख सारिका विधाते आदी उपस्थित होते.
‘पाथर्डी शहर तालुक्याचे लसीकरण अतिशय संथ गतीने चालू असून प्रत्येकाला लस मिळावी तसेच नागरिकांचे लस विषयी गैरसमज दूर व्हावे यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे,’ असे सांगत विखे पुढे म्हणाले, ‘खेडकर यांनी लसीकरण नावनोंदणी केद्र सुरु केल्यामुळे नागरिकांना लस घेणे सोयीचे जाणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना ऑनलाइन नावनोंदणी करणे माहिती नसल्यामुळे लसीकरणाकडे ते दुर्लक्ष करत होते. मात्र खेडकर यांच्या उपक्रमामुळे त्यांची गैरसोय दूर होणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदंब युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रतिक खेडकर यांनी केले, तर अजय विघ्ने यांनी सर्वांचे आभार मानले.