पाथर्डी- बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील ढगेवाडी येथील 13 वर्षीय मुलीचा बालविवाह रोखण्यात नगरच्या चाईल्डलाइनला व पाथर्डी पोलिसांना यश आले आहे. 17 ऑक्टोबरला हा बालविवाह थांबवण्यासाठी पोलिसांनी कार्यवाही केली. त्याच मुलीचा विवाहनंतर बीड जिल्ह्यात होत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे बीडच्या चाईल्ड लाईनला माहिती दिल्याने त्यांनी पोलिसांच्या मदतीने हा विवाह पुन्हा रोखला.
नगरमधील कारवाईत मुलीच्या पालकांनी दुसरीच 17 वर्षीय मुलगी दाखवली आहे. याचा खुलासा करण्यासाठी स्थानिक ग्रामसेवक आणि सरपंचांना सांगितले. त्यांनी घरी भेट दिली. पण मुलीचे पालक आणि मुलगी गायब होती. ही बाब चाईल्ड लाईनचे टीम मेंबर प्रवीण कदम यांना कळवली. या मुलीचा विवाह कुर्ला (ता. जि. बीड) येथे होणार असल्याचे समजले. त्यामुळे नगर चाईल्ड लाईनने बीड कार्यालयाशी संपर्क साधून बालविवाहाची माहिती दिली. त्यांनी बीड पाेलिसांच्या मदतीने हा बालविवाह रोखला.