शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज भरण्याचे आवाहन
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
महाविद्यालयांमध्ये सन 2021-22 या वर्षामध्ये प्रवेशित असणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांकरिता महाडीबीटी पोर्टलवर (https://mahadbtmahait.gov.in/Home/Index) सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. संकेतस्थळावर अर्ज भरण्यासाठी 31 जानेवारी ही अंतिम मुदत असून अहमदनगर जिल्ह्यात विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेशित अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनी मुदतीपूर्वी वरील नमूद पोर्टलवर अर्ज दाखल करावेत.
2018-19 किंवा त्यानंतर संकेतस्थळावर अर्ज भरलेला असल्यास त्याच आधारबेस यूजर आयडीने सन 2021- 22 या वर्षातील नूतनीकरणाचा अर्ज भरावा. यापूर्वी अर्ज भरलेला नसल्यास नवीन आधारबेस युजर आयडी तयार करून अर्ज भरण्यात यावा. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी देखील त्यांच्या महाविद्यालयात प्रवेशित अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचे विविध योजनांचे अर्ज भरण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. महाविद्यालयांमध्ये प्रवेशित एकही पात्र अनुसूचित जाती प्रवर्गाचा विद्यार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. 31 जानेवारी या अंतिम मुदतीत सर्व अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरून घ्यावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.