धक्कादायक : अहमदनगर जिल्ह्यात अचानक रुग्ण वाढले वाचा २४ तासांतील आकडेवारी !
नगर- प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यात आज १०८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७० हजार २५१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०६ टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १४१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १०२७ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ७०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५० आणि अँटीजेन चाचणीत २१ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १०, अकोले ०१, कर्जत ०२, नगर ग्रामीण ०६, नेवासा ०१, पारनेर ०५, पाथर्डी ११, राहाता १०,
संगमनेर ०७, शेवगाव ०३, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर ०१ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १३,
अकोले ०१, जामखेड ०२, कर्जत ०१, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण ११, पारनेर ०३, राहाता ०७, संगमनेर ०७, श्रीरामपूर ०२ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज २१ जण बाधित आढळुन आले. मनपा ०१, अकोले ०४, कर्जत ०२, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण ०१, पाथर्डी ०४, राहुरी ०२, शेवगाव ०३ आणि श्रीगोंदा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २९, जामखेड ०१, कोपर गाव ०७, नगर ग्रामीण २४, नेवासा ०१, पारनेर ०४, पाथर्डी ०९,
राहाता ०७, संगमनेर ११, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर ०३, मिलिटरी हॉस्पिटल ०१, इतर जिल्हा ०३आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
- बरे झालेली रुग्ण संख्या:७०२५१
- उपचार सुरू असलेले रूग्ण: १०२७
- मृत्यू:१०९९
- एकूण रूग्ण संख्या:७२३७७