शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्याला अटक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेतकऱ्यावर गोळीबार करणारा, तसेच 4 गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला कर्जत पोलीसांनी उस्मानाबाद मधून अटक अटक केली आहे. गोपनिय बातमीदाराकडुन सदरचा प्रकार हा अमऱ्या दत्तु पवार व करण पंच्याहत्तर काळे यांनी केला असल्याचे निष्पन्न झाले होते. यापैकी अमऱ्या उर्फ अमर दत्तु पवार हा नळी व़डगाव ता. भुम जि. उस्मानाबाद येथे येथून मोठ्या शिताफीने अटक केले होते. परंतु करण पंच्याहत्तर काळे पोलीसांना गुंगारा देवुन पळुन जाण्यात यशस्वी झाला होता. पोलीसांना आरोपी करण पंच्याहत्तर काळे याचा शोध घेवुन त्यास मोठ्या शिताफीने अटक केली. त्याच्यावर कर्जत, नगर, भूम, सातारा या ठिकाणी जबरी चोरी, दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीने शेतकऱ्यांनी पकडल्याने गोळीबार केल्याचे कबूल केले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. चंद्रशेखर यादव, पो. उप. निरी. अमरजित मोरे, पोना रविंद्र वाघ, शाम जाधव, पोकाँ देविदास पळसे, पोकाँ महादेव कोहक, पोकाँ शाहुराजे तिकटे यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पो. उप. निरी. अमरजित मोरे हे करित आहेत.