नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकार करेल- ना. जयंत पाटील
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी : अतिवृष्टीत नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना दिलासा देण्याचे काम राज्यशासन निश्चित करेल, असे राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्या नंतर संस्कार भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे,जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, ‘राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी २३ जानेवारीपासून राज्याचा दौरा सुरु केला होता. मात्र मध्यंतरी कोरोनाची लाट आल्याने दौरा खंडित केला होता. ठिकठिकाणी पक्षीय बैठकीचे आयोजन केले तर कार्यकर्त्याचा भावना समजून घेता येतात. सामाजिक प्रश्नांची माहिती सुद्धा मिळते. राज्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरीही सध्या पाउस चालूच असून ठिकठिकाणी पूर सुद्धा येत असल्याने अडचणी निर्माण होत आहे,’ असेही पाटील म्हणाले.