महाराष्ट्र
काँग्रेसचा स्वबळाचा नारा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार
By Admin
काँग्रेसचा स्वबळाचा नारा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था च्या नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि राज्याचे काँग्रेसचेनेते महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली स्वबळावर पूर्ण ताकदीनिशी लढवणार असल्याची माहिती पाथर्डी काँग्रेस तालुकाध्यक्ष नासिर शेख यांनी दिली. पाथर्डी तालुका कॉग्रेस पक्षाची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे महत्त्वाची बैठक कॉग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळूंखे, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक गणपतराव सांगळे, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष युवानेते स्मितल भैय्या वाबळे, गणपतराव सांगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. कोणतीही युती व आघाडी न करता कॉग्रेस पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषदेच्या १७ जागा स्वबळावर तालुका कॉग्रेस अध्यक्ष नासिरभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली लढवणार अशी जाहीर भूमिका जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे,ज्ञानदेव वाफारे, गणपतराव सांगळे, स्मितल भैया यांनी घेतली.
प्रास्ताविक करतांना नासिर शेख म्हणाले, पाथर्डी तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये काँग्रेस पक्षाचा संघटन अत्यंत मजबुतीने आकार घेत असून पाथर्डी तालुका आणि शहरांमध्ये ७५ शाखांचे नियोजन पूर्ण झाले असून या शाखांचे लवकरच उद्घाटन करण्यात येणार आहे. तालुक्यात आणि शहरात काँग्रेसला अत्यंत पोषक वातावरण असून लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम करत असून,पाथर्डी शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये काँग्रेसला सुवर्णयुग आणल्याशिवाय राहणार नाही. सर्वसामान्यांचे आणि गरीब जनतेचे प्रश्न सोडवणे, हे आमचे ध्येय असून पाथर्डी शहराला आलेला बकालपणा घालवून, भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका आणि पाथर्डीकरांच स्वच्छ, सुंदर, सर्वसुविधायुक्त शहराचं स्वप्न साकार करण्यासाठी काँग्रेस पक्ष पूर्णपणे स्वतःला झोकून देणार आहे. शहराला पुन्हा गतवैभव मिळवून देण्याच आमचं स्वप्न आहे.
याप्रसंगी पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष नासिर शहानवाज शेख, अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष जालिंदर काटे, अहमदनगर जिल्हा काँग्रेस प्रतिनिधी नवाबभाई शेख, अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस प्रा. दादासाहेब खेडकर, सेवादल काँग्रेस तालुकाध्यक्ष किशोर डांगे, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष रवींद्र पालवे, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष आनंद सानप, एस.सी काँग्रेस तालुकाध्यक्ष गणेश दिनकर, किसान काँग्रेस तालुकाध्यक्ष ज्ञानदेव खेडकर,तालुका, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष पोपट बडे, काँग्रेस सरचिटणीस सुभाष कोलते, एन. टी. काँग्रेस तालुका उपाध्यक्ष भगवानराव बुधवंत ,पाथर्डी तालुका युवक कांग्रेस उपाध्यक्ष जुनेद पठाण, तालुका काँग्रेस सरचिटणीस दिलीप वानखेडे, महिला काँग्रेस अध्यक्षा राणीताई वाखुरे, अल्पसंख्यांक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मुन्नाभाई खलिफा,तिसगाव चे ग्रामपंचायत सरपंच युवा नेते पापा शेठ तांबोळी, युवक काँग्रेस शहराध्यक्ष दत्ता पाठक,सेवादल काँग्रेस तालुका उपाध्यक्ष असलम शेख ,अल्पसंख्यांक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष जब्बार आतार,अल्पसंख्यांक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष युसूफ खान, तालुका काँग्रेस सरचिटणीस सूर्यभान गर्जे, एस.सी काँग्रेस शहराध्यक्ष अमित काळोखे, युवक काँग्रेस शहर कार्याध्यक्ष धनराज घोडके, युवक काँग्रेस शहर उपाध्यक्ष महेश दौंड, युवक काँग्रेस शहर उपाध्यक्ष उदय वारुळे,करोडी काँग्रेस कमिटी अध्यक्ष शहादेव खेडकर ,करोडी काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष वसंत खेडकर, सेवादल काँग्रेस तालुका उपाध्यक्ष समीर शेख, अल्पसंख्यांक काँग्रेस तालुका सरचिटणीस मोहम्मद शेख, तालुका काँग्रेस सरचिटणीस आशिष जायभाये, युवक काँग्रेस तालुका सरचिटणीस लक्ष्मण फुलमाळी, सेवादल काँग्रेस तालुका सरचिटणीस राहुल फुलमाळी, पाथर्डी तालुका काँग्रेस सरचिटणीस नवनाथ फुलमाळी, गाडेवाडी काँग्रेस अध्यक्ष नारायण मोरे आदींची उपस्थिती होती.
यावेळी पाथर्डी तालुका काँग्रेस सरचिटणीस पदावर आशिष जायभाये यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच पाथर्डी शहर महिला काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. पाथर्डी शहर महिला काँग्रेस उपाध्यक्ष पदावर उषाताई खेडकर, उपाध्यक्ष मंगल शिवाजी निंबाळकर, सरचिटणीस सुनंदा विजय भालेराव, सरचिटणीस आशा मुरलीधर खेडकर, उपाध्यक्ष शोभा संजय अकोलकर, सरचिटणीस मंगल दत्तू फुंदे, सेक्रेटरी गीता आजिनाथ वायकर, खजिनदार शारदा गणेश वाखुरे, सरचिटणीस हेमलता प्रदीप शेवाळे, कार्यकारी सदस्या संगीता विश्वनाथ मोहिते, विजया गोरडे यांची निवड करण्यात आली.
अध्यक्षीय सूचना सेवादल अध्यक्ष किशोर डांगे यांनी केली तर आभार तालुका उपाध्यक्ष रवी पालवे यांनी मानले.
Tags :
48750
10