मास्कबंदीच्या वृत्तावर 'यानी' केले कडक स्पष्टीकरण
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राज्यातील मास्कबंदी उठविण्याचे वृत्त धादांत खाेटे असल्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. काही माध्यमांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्कबंदी उठविण्यावर चर्चा झाली, असे वृत्त दिले हाेते. त्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी कडक शब्दात पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ''राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्कबंदी उठविण्याबाबत काेणतेहीची चर्चा झालेली नाही. दिलेले वृत्त हे धादांत खाेटे आहे. माध्यमांनी यासंदर्भात नीटपणे माहिती घेऊन बातमी द्यायला हवी.'' सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरलाच पाहिजे, हा मुख्यमंत्र्यांसह आमचा आग्रह आहे. परदेशात इंग्लंडसारख्या देशांनी मास्क न वापरण्याचा निर्णय घेतला असेल तर तो त्यांनाच लखलाभ आहे. आपल्या राज्यात तशाप्रकारची चर्चाही नाही. तसा कोणता निर्णयही झालेला नाही. कृपा करुन लोकांमध्ये कोणतेही गैरसमज निर्माण करु नयेत, असे पवार यांनी म्हटले आहे.