महाराष्ट्र
महाशिवराञीच्या दिवशी श्री क्षेत्र वृद्धेश्वर वेबसाईट प्रकाशित होणार
By Admin
महाशिवराञीच्या दिवशी श्री क्षेत्र वृद्धेश्वर वेबसाईट प्रकाशित होणार
पाथर्डी- प्रतिनिधी
श्री वृद्धेश्वर देवस्थान व PathardiCity.in यांच्या सहयोगाने श्री क्षेत्र वृद्धेश्वर यासंबंधित www.ShriVridheshwar.in वेबसाईट महाशिवरात्री चे औचित्य साधून प्रकाशित होत आहे.
वेबसाईट बनवण्यासाठी अनेक ग्रंथ, मासिके, उत्सव, विशेषांक, विद्वान व अभ्यासकांचे लेख, चरित्रे, सोशल मेडीया साईट, धार्मिक पुस्तके, सीडीज यांचा अभ्यास करून समग्र माहिती वाचण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. वेबसाईट साठी श्री वृद्धेश्वर देवस्थान समितील घाटशिरस चे सरपंच गणेश पालवे, ज्ञानेश्वर पाठक विशेष सहकार्य लाभले.
या वेबसाईट यात अनेक दुर्मिळ फोटो, माहिती उपलब्ध करण्याचा मानस आहे.
या वेबसाईट मध्ये श्री वृद्धेश्वर मंदिराचा इतिहास, उत्सव, परिसर, भेट देण्यासारखी जवळील धार्मिक ठिकाणे व नैसर्गिक ठिकाणे, कसे पोहोचायचे, जवळील महत्वाची सूची इ. माहिती दिली आहे.
श्री क्षेत्र वृद्धेश्वर येथे सुंदर असा अत्यंत निरर्गरम्य गर्भगिरी डोंगर आहे. पाणायचे झरे, शांत असा मंदिर परिसर ध्यान, योग साठी भाविकांचे आकर्षण आहे. मंदिर परिसर हा मनाला ऊर्जा देणारा आहे. हे ठिकाण “आयुर्वेदिक” वनस्पतींसाठी देखील प्रसिद्ध आहे. भाविक व पर्यटक यांच्या पर्यंत माहिती पोहचणे हा या वेबसाईट चा मूळ उद्देश आहे.
पर्यटन साठी हा एक निसर्गाच्या सानिध्यातील रमणीय परिसर आहे. जवळच मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी – सावरगाव ( मायंबा ), मढी या गावामध्ये एका टेकडीवर कानिफनाथ महाराजांची संजीवन समाधी ,श्री मोहटा देवी मंदिर – मोहटा आहे. हे सर्व परिसर अतंत्य रमणीय असून डोंगर व निसर्गाच्या सानिध्यात आहेत. तारकेश्वर गड, गहिनीनाथ गड, भगवानगड, लोहसरचा भैरवनाथ, चिचोंडी – आचार्य आनंदऋषी महाराजांची जन्मभूमी देवस्थाने श्री वृद्धेश्वर मंदिराजवळ आहेत त्याची हि माहिती या वेबसाईट मध्ये दिली आहे.
-----
पाथर्डीतील, अहमदनगर पर्यटन वाढवून रोजगार निर्माण साठी या वेबसाईट चा निश्चितच उपयोग होईल - PathardiCity.in
-----
मंदिर परिसरात जुन्या काळातील कोरीव दगड बसविण्याचे काम सुरू आहे.जुन्या पडलेल्या वाड्यांचा दगड या बांधकामासाठी वापरण्यात येत असल्याने मंदिर परिसर स्वच्छ व सुंदर दिसत आहे. या दगडी बांधकामामुळे मंदिर व परिसराचे जणू रूपच बदलत आहे. या साठी वेबसाईट माध्यमातून लोकांपर्यंत माहिती पोहचून भाविकांचे सहकार्य लाभून या क्षेत्राचा विकासासाठी मदत होईल -
गणेश पालवे, सरपंच घाटशिरस
पाथर्डी तालुक्यातील गर्भगिरी डोंगराच्या पायथ्याशी निसर्गाच्या सान्निध्यात असलेले श्रीक्षेत्र वृद्धेश्वर हे तालुक्यातील नव्हे, तर जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. श्री क्षेत्र वृद्धेश्वर हे नाथ पंथाचे आद्य शक्तीपीठ आहे. भाविक व पर्यटक मोठा संख्येने येथे भेट देतात. या साठी वेबसाईट च्या माध्यमाने भाविक व पर्यटकांपर्यंत माहिती पोहचण्यास मदत होईल
ज्ञानेश्वर पाठक, सोशल मीडिया, श्री वृद्धेश्वर देवस्थान
Tags :
408
10