पाथर्डी- माळीबाभुळगाव ग्रामपंचायतला ग्रामसेवक मिळावा
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी तालुक्यातील माळीबाबुळगाव येथे ग्रामसेवक मिळावा, अशी मागणी माळीबाभुळगाव ग्रामपंचायत चे युवा सदस्य गणेश वायकर यांनी तहसीलदार श्याम वाडकर व गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, ग्रामपंचायत माळीबाभुळगाव येथे एक ते दीड महिन्यापासून ग्रामसेवक आभावी कामकाज पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार मिळत नाही व दीपावलीचा सण आल्यामुळे गावातील स्वच्छता करणे आवश्यक आहे व गावातील बंद दिवे चालू करणे आवश्यक आहे तसेच गावातील वस्तीवरील रस्ते अतिवृष्टीमुळे खराब झालेले असून ते दुरुस्त करणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामसेवक लवकरात लवकर मिळावेत. न मिळाल्यास १ नोव्हेंबर २०२१ या दिवशी कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता ग्रामपंचायत कार्यालय माळीबाभुळगाव याठिकाणी ग्रामसेवक मिळेपर्यंत आमरण उपोषण करणार आहे व त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशारा माळीबाभुळगाव येथील ग्रामपंचायत सदस्य गणेश वायकर यांनी दिला आहे.