पाथर्डी- 'या' कारखान्याच्या पुढाकारातून १४० महीलांना पिठाच्या गिरणीचे वाटप
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे यांच्या पुढाकारातून १४० महिलांना सवलतीच्या दरात घरगुती पिठाच्या गिरणीचे वाटप करण्यात आले.
संस्कार भवनमध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, केदारेश्वरचे संचालक ऋषिकेश ढाकणे, बंडू बोरुडे, सीताराम बोरुडे, योगिता राजळे, उज्ज्वला शिरसाठ, अनुराधा कराळे, सुधीर शिरसाठ, स्वाती चव्हाण, रत्नमाला उदमले हे उपस्थित होते.