मोबाईल हॅक करून बँकेतील पैसे लांबविले
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील सरकारी नोकरी करणार्या एका 38 वर्षीय महिलेचा मोबाईल हॅक करून स्टेट बँकेच्या येथील शाखेतील खात्यातून 35 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
या नोकरदार महिलेने 27 डिसेंबर रोजी सायंकाळी पावणेसात वाजता त्यांच्या बँक खात्यावर 35 हजार रुपये मोबाईल फोनवरून स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या योनो अॅपद्वारे घराचा हप्ता भरण्यासाठी व्यवहार करण्याचा प्रयत्न केला असता, ते झाले नाही.
परंतु, त्यानंतर लगेच मोबाईलवर एका मेसेजमध्ये 18 हजार, दुसर्या मेसेजमध्ये 11 हजार रुपये व तिसर्या मेसेजमध्ये 6 हजार रुपये, असे तीन मेसेज एकामागे एक येत, 35 हजार रुपये महिलेच्या खात्यावरुन काढून घेतले. मोबाईलवर आलेल्या मेसेजवरून असे कोणतेही ऑनलाईन पैसे पाठविले नसून, फसवणूक झालेल्या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.