महाराष्ट्र
9217
10
प्रेमात फसगत अन् कर्जबाजारी झालेल्या युवकाची नदीपात्रात उडी
By Admin
प्रेमात फसगत अन् कर्जबाजारी झालेल्या युवकाची नदीपात्रात उडी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
प्रेमामध्ये झालेली फसगत आणि शेअर बाजारामुळे झालेल्या कर्जबाजारीपणाला कंटाळून युवकाने गोदावरी नदीपात्रात प्रवरासंगम येथील पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक मंगळवारी उघडकीस आली.
युवकाने सोशल मिडियावर आपण आत्महत्या करीत असून कोणालाही जबाबदार धरू नये असे आत्महत्या करण्यापूर्वी टाकले होते. नेवासा पोलिसांनी चोवीस नदीपात्रात शोध मोहिम राबविल्यानंतर आज दुपारी या युवकाचा मृतदेह सापडला.
देवेंद्र मोहिनीराज थोरात असे या युवकाचे नाव असून त्याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी नेवासा फाटा येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल करुन नातेवाईकांच्या ताब्यात दिला. स्वतः तिनेच प्रोपोज केले. मी हे प्रोपोज स्विकारले. ती खोट बोलत गेली आणि मी तीच ऐकत राहीलो आणि शेवटी फसगत झाली. जीवनात दोन गोष्टी महत्वाच्या असतात. एक लग्न आणि दुसर करिअर दोन्ही गोष्टीत मी अपयशी ठरलो. शेअर मार्केटमध्ये कर्जबाजारी झालो. त्यामुळे मी माझा स्वत:चा चेहराही आरशासमोर उभा राहून पाहू शकत नाही.
मी आत्महत्या करीत असून यात कोणालाही जबाबदार धरु नये, अशी पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित करुन सोमवार (दि. 15) रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास प्रवरासंगम येथील गोदावरी नदीपात्रात पुलावरुन उडी मारुन नेवासा येथील या युवकाने आत्महत्या केली होती. या युवकाचे मृतदेह पोलिसांना मिळून न आल्यामुळे मृतदेहाची शोधाशोध युद्घपातळीवर गोदावरी नदीपात्रात सुरु होती.
या युवकाचे एका उच्चभ्रू समाजातील मुलीशी प्रेम प्रकरण होते, अशी कबुली या युवकाने सोशल मीडियावरील आपल्या फेसबुकवर टाकून आत्महत्या केली.यामध्ये हा युवक म्हणाला की, माझी फसगत झाली.
प्रेमात धोका, जीवनात आर्थिक अडचणीपेक्षा मानसिक त्रास होत असल्यामुळे आणि माझ्या जन्मदात्या आईची इच्छाही पुरी करु न शकल्याने आणि जीवनात करिअरही करु न शकल्यामुळे माझ्या मनात नैराश्य निर्माण झाले आहे. त्यामुळे ही माझ्या विचारांती हा निर्णय घेवून आत्महत्या करीत असून याबाबत कोणालाही दोषी धरु नये, असे आवाहन त्याने पोलिसांना केले. त्यानंतर त्याने नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली.
आज दुपारी या युवकाचा मृतदेह नदीपात्रात सापडला. पोलिसांनी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून त्यानंतर तो मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
Tags :
9217
10





