समुद्धी महामार्गावर पहिला अपघात, कारची जोरदार धडक
नगर सिटीझन टिम प्रतिनिधी
Maharashtra Samruddhi Mahamarg : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते काल समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Express Way) नागपूर-शिर्डी (Nagpur-Shirdi)या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पार पडलं.
उद्घाटनाला चोवीस तास उलटत नाहीत तोच समृद्धी महामार्गावर पहिल्या अपघाताची (Accident) नोंद झाली आहे. वायफळ टोल नाक्यावर स्लो स्पीडने जाणाऱ्या एका कारला मागून वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. यात दोन्ही कारचं प्रचंड नुकसान झालं.
अपघातात सुदैवाने कोणीही जखमी नाही
आज दुपारी झालेल्या या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नसून दोन्ही कारचे मात्र मोठे नुकसान झालं आहे. कालच समृद्धी महामार्गाचा वायफळ टोल नाक्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी उद्घाटन केले होते आणि आज त्याच ठिकाणी अपघात झाला.
कारचे मात्र मोठे नुकसान - आज झालेल्या या अपघातात कोणीही जखमी झाले नसून दोन्ही कारचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. समृद्धी महामार्गाचा वायफळ टोल नाक्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले होते. आज त्याच ठिकाणी अपघात ( car accident Samriddhi Highway ) झाला आहे.