महाराष्ट्र
श्री रत्न जैन विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
By Admin
श्री रत्न जैन विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
पाथर्डी- प्रतिनिधी
श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळ संस्थेचे माणिकदौंडी येथील श्री रत्न जैन विद्यालय येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून सावित्रीच्या लेकींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले.
स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, थोर समाजसेविका, ज्ञानज्योती, विद्येची देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून ३ जानेवारी २०२३ ला श्रीरत्न जैन विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता पालक पार्वती गर्जे, मनिषा कावळे, रोहिणी फुंदे, अन्नपूर्णा गर्जे तसेच महिला शिक्षिकांच्या शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम माळी होते. सिद्धी जिवडे, रोशनी तळेकर, सादिया पठाण, पूजा आंधळे, रोहिणी चितळे, आचल पवार, दुर्गा चितळे या विद्यार्थिनींची सुरुवातीला सावित्रीबाई फुले या विषयावर भाषणे झाली. त्यानंतर विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी भारुड, नाटिका, पथनाट्य तसेच फुले दांपत्याच्या कार्यावर आधारित गीतांच्या ठेक्यावर बहारदार नृत्य सादर करून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले.
यावेळी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक सूर्यभान दहिफळे, नवनाथ बुचकुल, संजय राठोड, अविनाश नरवडे, निलेश शिरसाट, प्रदीप कीर्तने, सुमित फलके, राजेंद्र चव्हाण, समाधान आराख, प्रशांत रक्ताटे, संदीप खेडकर, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांस्कृतिक विभागाच्या शिक्षिका अनिता घोलप, सुधा खामकर, संगीता मोरे, करुणा कोकाटे यांनी सर्व कार्यक्रम विद्यार्थिनींच्या साहाय्याने कार्यक्रमाचे नियोजन उत्कृष्ट करून, अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहिणी डमाळे, अनुमोदन साक्षी शेळके, सूत्रसंचालन साधना चौधरी व रोहिणी चौधरी यांनी केले तर आभार प्रतिक्षा आंधळे या विद्यार्थिनीने मानले.
Tags :
655664
10