मूकबधिर विद्यालयात विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप
पाथर्डी प्रतिनिधी
इंटिग्रल ऍड सायन्स (IAS) या कंपनीच्या वतीने पाथर्डी येथील निवासी मुक बधीर विद्यालयात विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप नुकतेच करण्यात आले.
यावेळी स्कूल बॅग, वह्या आणि कंपास पेटी असे शैक्षणिक साहित्य वाटप आणि त्याच बरोबर स्नेहभोजन ही ठेवण्यात आले होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार डालिंबकर, सामाजिक कार्यकर्ते सुनिल पाखरे, दादासाहेब फुंदे, आयएएस कंपनीचे सुपरवायझर निलेश फुंदे, शरद फुंदे,संदीप फुंदे, सचिन बडे, समर्थ जिरेसाळ, किशोर वखरे, संकेत बडे, अक्षय केदार, प्रसाद बडे, चक्रधर बडे, गोविंद अंदुरे, तन्वीर पिंजारी आदी उपस्थित होते.