श्रीकृष्ण गोमाता शाळेत त्रिदिनी अखंड हरनाम सप्ताह व मुर्ती प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील करडवाडी येथील श्री कृष्ण गो माता शाळेत (दि. 15) गुरुवार रोजी भक्त शिरोमणी बजरंग बली व शनि महाराज मुर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा त्रिदिनी अखंड हरनाम सप्ताह कार्यक्रम होणार असून गो माता सेवक व भाविक भक्तानी उपस्थित राहुन किर्तन सेवा व प्रसादाचा लाभ घ्यावा. तसेच प्रसाद दिवसातून सकाळ व संध्याकाळ दोन वेळी होईल.तसेच ब्राह्मण देव यांच्या हस्ते दिवसभर पुजा पाठ हवन होईल. सायंकाळी हरिपाठ कीर्तन सेवा 6 ते 8 या वेळेस होईल.यानंतर प्रसादाची पंगत होईल या कार्यक्रमासाठी साधु संत महात्मे तसेच नामवंत कलाकार गायक वादक उपस्थित राहणार आहेत.सर्व भाविक भक्तानी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री कृष्ण गो माता अध्यक्ष दिपक महाराज काळे यांनी केले आहे.