महाराष्ट्र
212411
10
अजित पवारांनी माफी मागावी : खासदार डॉ. सुजय विखे
By Admin
अजित पवारांनी माफी मागावी : खासदार डॉ. सुजय विखे
तर स्वतः उपोषण करणार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचे रक्षण केले. त्यामुळे त्यांना धर्मवीर अशी उपमा इतिहासकरांनी दिली आहे. मात्र विरोधी पक्ष नेते महाविकास आघाडी सरकारचे पाप झाकण्यासाठी संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, असा जावाई शोध लावला आहे.
याचा आम्ही निषेध करतो. अजित पवारांनी माफी मागावी, असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी श्रीगोंदा येथे बोलतांना दिला आहे.
पेडगाव येथे बहादुर गडावर जाऊन छत्रपती संभाजी महाराज स्मृतीस्तंभास खा. विखे, आमदार बबनराव पाचपुते व भाजपच्या कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. पेडगाव ते श्रीगोंदा रॅली काढून श्रीगोंदा तहसिल कार्यालयासमोर निषेध सभा घेतली. त्यावेळी पत्रकारांशी खा. विखे यांनी संवाद साधला
खा. विखे म्हणाले, की ज्या मोगलांनी हिंदु धर्मातील देवस्थानची विंटबना केले. महिलांवर अत्याचार केले. त्या मोगलाच्या कबरी नुतनीकरण करण्यासाठी आघाडी सरकारने निधी दिला. जिल्ह्याचे विभाजन करण्यासाठी माझा सुरुवातीपासून विरोध आहे आणि नामांतराचा विषय ऐरणीवर आला आहे. हा निर्णय नगर जिल्ह्यातील जनतेच्या भावना विचारुन घेऊन करावा अशी माझी भुमिका आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातील अपुर्ण कामे पुर्ण अथवा नवीन कामे सुरु करण्यासाठी येत्या सहा महिन्यांत सपाटा लावणार आहे.
यावेळी प्रतापसिंह पाचपुते, संदीप नागवडे, बाळासाहेब महाडीक, दत्तात्रय पानसरे, बाळासाहेब गिरमकर, सचिन कातोरे, बापू गोरे, ज्ञानेश्वर विखे, अशोक खेंडके, लक्ष्मण नलगे आदि उपस्थित होते.
…तर स्वतः उपोषण करणार : खा. विखे
नगर-दौंड रोडवर लोणीव्यंकनाथ शिवारातील उड्डाणपुल व रस्ता डांबरीकरणचे काम पंधरा दिवसात सुरु झाले नाही तर मी स्वतः श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार आहे असा इशारा खा. डॉ. सुजय विखे यांनी देत केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणावर नाराजीचे आसुड ओढले.
Tags :

