महाराष्ट्र
32910
10
राजकीय पुढार्यांचे ऐकून शासकीय अधिकारी कर्मचारी सर्वसामान्य
By Admin
राजकीय पुढार्यांचे ऐकून शासकीय अधिकारी कर्मचारी सर्वसामान्य लोकांना त्रास देत असतील तर त्यांना कायद्याने सरळ करू
प्रा किसन चव्हाण
पाथर्डी- प्रतिनिधी
आज बुधवार दिनांक 4 ऑक्टोबर 2023 रोजी पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस व तालुक्यातील आदिवासी समाजाच्या विविध मागण्या संदर्भात तहसील कार्यालय पाथर्डी च्या समोर वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ढोलकी बजाव आंदोलन करण्यात आले दुपारी पाथर्डी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली या मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीचे भटकेमुक्तांचे नेते डॉ अरुण जाधव एकलव्य आदिवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल जाधव, पाथर्डी वंचित चे तालुकाध्यक्ष रवींद्र उर्फ भोरू मस्के, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के, जिल्हा महासचिव योगेश साठे, तालुका महासचिव संजय कांबळे,झुंबर माळी पाथर्डी शहराध्यक्ष इरफान शेख ,सोपान भिंगारे ,राजुशेठ पठाण नंदूभाऊ कांबळे, राजू पवार, अरुण थोरात यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण बोलतांना म्हणाले की, शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची मुजोरी वाढली असून राजकीय प्रस्थापित पुढाऱ्यांचे ऐकून हे अधिकारी व कर्मचारी सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी व बहुजन समाजाला त्रास देत आहेत यापुढे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्रास दिल्यास कायद्याने त्यांना सरळ करू अधिकारी व कर्मचारी गावोगावच्या गाव पुढाऱ्यांरी व अन्याय अत्याचार करणारे गावगुंडांना अभय देतात व त्याला कारणीभूत तालुक्याचे प्रतिनिधी आहेत तेच लोकप्रतिनिधी गावोगावच्या त्यांच्या बगलबच्च्यांना त्यांनी अन्याय केला तरी देखील मदत करतात आणि म्हणून यापुढे या सगळ्यांचा कायद्याने हिशोब चुकता केला जाईल असेही प्रा चव्हाण म्हणाले ,यावेळी डॉ अरुण जाधव अनिल जाधव ,अरविंद सोनटक्के झुंबर माळी यांची ही भाषणे झाली तालुक्याचे तहसीलदार श्री वाडकर साहेब यांनी तातडीने बैठक घेऊन गावो गावचे प्रश्न सोडवले जातील असे आश्वासन दिले यावेळी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजगुरू साहेब यांच्यासोबत पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता त्यांनीही बोलताना, कायदा मोडणाऱ्यांना कुणीही पाठीशी घालणार नाही त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांनाही अद्दल घडवू असा शब्द दिला
मोर्चामध्ये आदिवासी माता-भगिनी व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
Tags :
32910
10





