पाथर्डी- जावयाला संकटातून बाहेर काढण्यासाठी पुर्ण तालूका कामाला केले असे केले काही
पाथर्डी- प्रतिनिधी
शिंगोरी (ता.शेवगाव) येथील धर्मराज नामदेव चेमटे यांच्या मुलीचे दोन वर्षांपूर्वी महादेव दगडू फुंदे (रा. वाळुंज, ता. पाथर्डी ) यांच्याशी विवाह झाला.
महादेव फुंदे हे मुंबई याठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा बलात सुरक्षारक्षक म्हणून काम करतात . त्यांचा २२ फेब्रुवारी रोजी कामावरून घरी येत असताना कल्याण रेल्वेस्टेशन जवळ चालू रेल्वेतून पडून अपघात झाला.
त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांच्यावर दोन मोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या.
यात जवळपास ४ ते ५ लाखांचा खर्च झाला. घरची परिस्थिती बिकट असल्याने वडिलांनी शेतजमीन विकून पैसे भरले. मात्र महादेव फुंदे अजूनही कोमातच असून अधिकच्या उपचारासाठी अजून काही शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
यासाठी ७ ते ८ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याने सोशल मीडियातून नातेवाईक, मित्र परिवाराकडून मदतीसाठी आवाहन करण्यात येत आहे.
या आवाहनास प्रतिसाद देत शिंगोरी या सासुरवाडीतील युवकांनीही पुढाकार घेऊन मदत गोळा केली. गावातील व व्यावसायिक यांच्या मदतीने ३० हजार रुपये जमा केले. तसेच शेवगाव-पाथर्डीसह राज्यभरातून अनेकांनी संबंधिताच्या खात्यावर जवळपास ५ लाखांची मदत जमा केली आहे.