पाथर्डी- बंद घर फोडले; 5 लाख 83 हजार रुपये लांबवले;मुख्याध्यापकाच्या घरी चोरी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी पाच लाख 83 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना पाथर्डी शहरातील दत्तनगर विभागात घडली आहे. या संदर्भात शारदा चंद्रकांत खाडे यांनी तक्रार दिली आहे.
त्यात नमूद केला आहे की, माझे पती चंद्रकांत खाडे हे वसंतदादा पाटील विद्यालयात मुख्याधापक म्हणून कार्यरत असून 7 एप्रिल रोजी आम्ही कुटुंबातील सर्वजण जोडमोहोज येथील यात्रेसाठी गेलो होतो.
आमच्या शेजारी राहणारे अशोक खेडकर यांनी माझ्या पतीला रविवारी सकाळी फोन करून सांगितले की, तुमच्या घराचा दरवाजा उघडा आहे. आम्ही तातडीने घरी आलो असता घराच्या गेटचे कुलूप तोडले होते. घरातील सामानाची उचकापाचक केली होती. तर किचनमधील एका डब्यात ठेवलेला सोन्याचा राणी हार,नेकलेस,सोन्याची चैन,मंगळसूत्र,गंठन,अंगठ्या,कानातील जोड असे एकूण तीन लाख 83 हजार रुपयांचे सोने व रोख दोन लाख असा एकूण 5 लाख 83हजार 100 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत श्वानपथकाला बोलावले. मात्र, चोरट्यांचा मागमूस सापडला नाही.