महाराष्ट्र
9808
10
नगरपरिषदेच्या बनावट कागदपत्रांद्वारे घेतला परमिट रूमचा
By Admin
शेवगाव- नगरपरिषदेच्या बनावट कागदपत्रांद्वारे घेतला परमिट रूमचा परवाना; शेवगाव पोलिसांत गुन्हा दाखल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नगरपरिषदेच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परमिट रूमचा परवाना घेणाऱयावर शेवगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शेवगाव शहरातील गेवराई रस्त्यावरील हॉटेल सरगमसाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे परमिट रूमचा परवाना घेतल्याचे चौकशीअंती समोर आले आहे.
मनोज भगवान आहुजा (रा. शेवगाव) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. नगरपरिषदेचे कर्मचारी अशोक सुपारे यांनी फिर्याद दिली आहे.
शेवगाव शहरातील गेवराई रस्त्यावरील हॉटेल सरगममधील परमिट रूमचा परवाना बनावट कागदपत्रांच्या आधारे घेण्यात आल्याचा तक्रार अर्ज एका व्यक्तीने 13 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हाधिकाऱयांना सादर केला होता. या अर्जाची राज्य उत्पादन शुल्कच्या उपअधीक्षक अधिकाऱयांमार्फत चौकशी करण्यात आली. चौकशीत अनेक त्रुटी आढळून आल्या. हॉटेल सरगमच्या परमिट रूम परवाना मंजुरीला अज्ञात साथीदारांच्या मदतीने शेवगाव नगरपरिषदेचे बनावट दाखले व ठरावाची प्रत देऊन नगरच्या उत्पादन शुल्क विभागाकडून परवाना हस्तगत केल्याचे समोर आले आहे.
परवान्यासाठी 7 जानेवारी 2019 रोजी बांधकाम पूर्णत्वाचा दिलेला दाखला नगरपरिषदेने दिला नाही. त्यावर तत्कालीन मुख्याधिकाऱयांच्या बनावट सह्या आहेत. 16 जानेवारी 2019 रोजी ना-हरकत दाखला, स्वच्छता दर्जा दाखला, लोकसंख्येचा दाखला अशी कागदपत्रेही खोटी आहेत. त्यावरही तत्कालीन मुख्याधिकाऱयांच्या बनावट सह्या आहेत, तर परवान्यासाठी दिलेला 29 जानेवारी 1920 रोजीचा नगरपरिषद ठराव क्रमांक 27 हा नगरपरिषदमार्फत देण्यात आलेला नसल्याचे आढळून आले.
बनावट कागदपत्रे तयार करणारे ठग
शहरात इतर काही परमिट रूम परवान्यास अशाच पद्धतीने खोटी कागदपत्रे सादर केल्याचा संशय आहे. अशी कागदपत्रे तयार करणारे काही ठग शहरात आहेत. यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता असल्याने या प्रकारची चौकशी करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.
Tags :
9808
10





