सरकारी कामात अडथळा; सरपंचावर गुन्हा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
सरकारी कामात अडथळा आणला, म्हणून पाथर्डी तालुक्यातील मालेवाडीचे सरपंच आजीनाथ पांडुरंग दराडे यांच्याविरुद्ध पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महावितरणचे वरिष्ठ तांत्रिक कर्मचारी आदिनाथ महादेव चौधरी यांनी फिर्याद दिली. 5 फेब्रुवारी रोजी मालेवाडी येथे एअर पंच केबल टाकण्याचे काम सुरू होते.
दुपारी 3 वाजता सरपंच आजीनाथ पांडुरंग दराडे हे चौधरी यांना म्हणाले की, तुम्ही काही ठिकाणी सिंगल फेज केबल का वापरली आहे. पूर्ण गावाला थ्री फेज टाका, कामाचे इस्टीमेट आम्हाला द्या, तुम्ही संपूर्ण गावाला थ्रीफेज केबल टाका, नाहीतर तुमचे काम बंद करा. त्यावेळी चौधरी सरपंच दराडे यांना आमचे सरकारी काम आहे, ते बंद होणार नाही.
तुम्ही सरकारी कामात अडथळा आणू नका, तुमची काही तक्रार असेल, तर वरिष्ठ अधिकार्यांना सांगा, असे सांगितले. त्यावर सरपंच दराडे, यांनी चौधरी यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर झगडे ग्रुपचे सुपरवायझर नामदेव उत्तम बोडखे (रा खरडगाव ता शेवगाव) यांना सरपंच खेडकर म्हणाले की, तुम्ही आमचे गावात कसे काय आले, तुम्ही काम बंद करुन टाका, नाही तर वायरमन आदिनाथ चौधर यांना व तुम्हाला येथेच जीव मारुन टाकू अशी धमकी दिली. त्यावेळी झगडे ग्रुपचे कामगार संतोष काशिराम पावरा याला जम्प कट करणेसाठी सांगितले असता, तो खांबावर चढला असता, त्यास सरपंच दराडे यांनी धमकी देत एका घरात कोंडूुन ठेवले व थोड्या वेळाने सोडून दिले.