आमदार मोनिकाताई राजळे यांच्यामुळे कळसपिंपरी गावचा सर्वागीण विकास- दिंगबर भवार
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील कळसपिंपरी गावामध्ये आ. मोनिका राजळे आणि जि. प. सदस्य याच्या मार्फत गावासाठी विविध सरकारी विकासात्मक योजना राबविण्यात येत आहेत.
यामध्ये गावचा शोभादायक सभामंडप, डांबरीकरण रोड, विदयुतिकरण, दलित वस्थी सुधरणीक योजना, वस्थी ला मुरुमीकरण, ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्ती अश्या विविध प्रकारच्या योजना गावामध्ये यापूर्वी राबविण्यात आल्या.तसेच गावचा सर्वागीण विकास केला.असे मत युवा नेते दिंगबर भवार यांनी व्यक्त केले.
(दि. 22) डिसेंबर रोजी आ. राजळे यांच्या मार्फत खुप दिवसापूर्वी पासून गावासाठी जि.प. शाळा खोल्या उपलब्ध नव्हत्या. वारंवार मागणी करून निधी उपलब्ध होतं नव्हता परंतु मा. सरपंच दिंगबर भवार यांनी आ.राजळे यांच्या समोर आपले गावच्या शाळेचे गाऱ्हाणे मांडून अखेर निधी खेचून आणला. यामुळे गावातून सर्व नागरिकांनी, सुद्य पालकवर्गांनी उद्घाटन प्रसंगी आ. मोनिका राजळे, राहुल राजळे, आणि दिगू शेठ यांचे आभार मानले.
यावेळी ह. भ. प लक्ष्मण महाराज भवार यांच्या हस्ते उद्धघाटन करण्यात आले. याप्रसंगी हरिहरेश्वर पँनल चे अद्यक्ष भाऊसाहेब भवार,मा.सरपंच दिगंबर भवार, सरपंच बळीराम मिसाळ, ग्रामसेवक पातकळ भाऊसाहेब ईजि राजळे साहेब ,माझी शिक्षक बुळे गुरुजी, गर्जे गुरुजी, संजय पवार अनिल चव्हाण, हिरामन गाडे, अमोल गाडे, प्रमोद मिसाळ, राजेंद्र गणगे, शिवाजी बुळे, बबन भवार, दत्तात्रय गंणगे हरिचंद्र भाकरे, पांडुरंग मिसाळ,बबलू चव्हाण,गणेश मापारी, संजय मिसाळ, योगेश शेळके,अंकुश तरटे आदी उपस्थित होते.