महाराष्ट्र
राष्ट्राच्या सक्षमीकरणांमध्ये युवकांची महत्त्वाची भूमिका- राहुलदादा राजळे
By Admin
राष्ट्राच्या सक्षमीकरणांमध्ये युवकांची महत्त्वाची भूमिका- राहुलदादा राजळे
पाथर्डी- प्रतिनिधी
श्री दादापाटील राजळे शिक्षण संस्थेचे, दादापाटील राजळे कला विज्ञाण व वाणिज्य महाविद्यालय अदिनाथनगर राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिरचा मढी येथे उदघाटन समारंभ पार पडला.
या कार्यक्रमासाठी उदघाटक मा श्री राहुलदादा राजळे विश्वस्त, श्री दादापाटील राजळे शिक्षण संस्था, प्रमुख पाहुणे वक्ते इतिहास तज्ञ मा डॉ. किसनराव अंबाडे, अध्यक्ष, इतिहास विषय अभ्यास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व इतिहास विभाग प्रमुख न्यू आर्ट्स, कॉमर्स व सायन्स कॉलेज अहमदनगर हे उपस्थीत होते. कर्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री बबनराव मरकड अध्यक्ष कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट हे होते. याप्रसंगी राजमाता जिजाबाई यांची जयंती, स्वामी विवेकानंद यांची जयंती, स्व. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची जयंती, व स्व. अण्णासाहेब शिंदे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. डॉ. किसनराव अंबाडे यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिर हे विद्यार्थ्यांच्या सामाजिक विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते. विद्यार्थ्यांचा सामाजिक विश्वास हा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवतो आणि हा वाढलेला आत्मविश्वास देशाला सामर्थ्यवान बनवतो असे प्रतिपादन केले.
मा. श्री राहुलदादा राजळे यांनी मनोगत व्यक्त करताना राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो व श्रमदानातून सामाजिक भावना निर्माण होते असे मत व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष बबनराव मरकड, यांनी या शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मा. डॉ. विलास मढीकर, मा. श्री. नवनाथ मरकड, भाऊसाहेब मरकड, मढी ग्रामपंचायतचे उपसरपंच मा. श्री. रविंद्र आरोळे, श्री. दादापाटील राजळे शिक्षण संस्थेचे विश्वस्त, मा. श्री. सुभाषराव ताठे, मा. श्री. शेषराव ढाकणे, मा. श्री. काशिनाथ बर्डे, मा. श्री. बाळासाहेब गोल्हार व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांनी केले. सर्व प्राध्यापक तसेच सेवक वृंद उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाधिकारी प्रा. आसाराम देसाई प्रा. शेख अस्लम प्रा. योगिता इंगळे व डॉ. नितीन भिसे यांनी विशेष श्रम घेतले
या कार्यक्रमाचे आभार कार्यक्रमाधिकारी डॉ. साधना म्हस्के यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेविका कदम वैष्णवी हिने केले.
Tags :
45555
10