महाराष्ट्र
पळून जाऊन लग्न करणाऱ्यांवर निर्बंध आणण्यासाठी कायदा व्हावा, खासदार सुजय विखे-पाटील
By Admin
पळून जाऊन लग्न करणाऱ्यांवर निर्बंध आणण्यासाठी कायदा व्हावा, खासदार सुजय विखे-पाटील
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
18 वर्षांच्या पुढची सुशिक्षित मुलं आणि मुलं सध्या ज्या पद्धतीने आई-वडिलांच्या मनाविरुद्ध जाऊन पळून लग्न करू लागले आहे ही चिंतेची बाब आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी पळून जाऊन लग्न करण्यावर निर्बंध येण्यासाठी कायदा व्हावा, अशी मागणी डॉ. सुजय विखे-पाटील यांनी केली आहे.
नगर शहरातील एका कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले.
नगर जिल्ह्यामध्ये महिन्याला जवळपास दीडशे केस अशा प्रकारच्या आढळून येतात आणि हा समाजाला एक फार मोठा धोका निर्माण झालेला आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. यामुळे आई-वडिलांचा मुला-मुलींवर आणि मुला-मुलींचा आई-वडिलांवर विश्वास कमी होत जाईल आणि हे भविष्याच्या दृष्टिकोनातून घातक आहे. या सगळ्या प्रकरणांना काहीतरी आळा बसायला हवा. त्यात 'लव्ह जिहाद' हा एक त्यातील घातक प्रकार आहे. त्यामुळे पळून जाऊन करून विवाह करण्यावर निर्बंध आणण्यासाठी एखादा कायदा करण्यात यावा अशी सगळ्यांची मागणी आहे, असे खासदार विखे म्हणाले.
…तर मी राजकारणात आलो नसतो
मला जनतेच्या प्रेमामुळे राजकारणात यावे लागले. डॉक्टर या नात्याने मी माझा व्यवसाय चांगला करत होतो. मला आजही वाटते मी राजकारणात नसताना समाजाला चांगले दिशा देण्याचे काम करू शकतो, असे खासदार सुजय विखे-पाटील यांनी म्हटले.
मला जनतेच्या प्रेमामुळे राजकारणात यावं लागलं, डॉक्टर या नात्याने मी माझा व्यवसाय चांगला करत होतो, मला आजही वाटतं मी राजकारणात नसताना समाजाला चांगलं दिशा देण्याचे काम करू शकतो, मात्र जनतेने दिलेली जबाबदारी पार पाडावी लागते आणि ती पार पाडत आज पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली त्यांचा संदेश कुणीतरी पुढे जावं लागणार आहे आणि मी एक माध्यम म्हणून मी तो संदेश पुढे घेऊन जात आहे' असं खासदार सुजय विखे पाटील यांनी म्हटलं.
आपण जर खासदार नसता आणि राजकारणात नसता तर सध्याची राजकारणाची घसरलेली पातळी आपण राजकारणात आला असता का? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना खासदार सुजय विखे पाटील बोलत होते. 'केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि खासदार संजय राऊत यांचा वाद टोकाला गेला आहे, अगदी हाणामारीची भाषा केली जात आहे. यावर बोलताना राजकारणाची पातळी घसरल चाललेली आहे, त्याच्यावर कुठेतरी निर्बंध प्रत्येक पक्षांनी केला पाहिजे. असं माझं वैयक्तिक मत आहे.
ते दोघेही नेते खूप मोठे आहेत. त्यांच्यावर मी भाष्य करणं उचित नाही पण नेत्यांना टीव्हीच्या माध्यमातून लोक त्याला पाहतात आणि म्हणून त्या गोष्टीमुळे अनेक विचार अनेक प्रसंग लोकांच्या मनामध्ये येऊ शकतात. त्यामुळे थोडसं प्रत्येक पक्षाच्या प्रवक्त्यांनी देखील जपून बोललं पाहिजे, असं खासदार सुजय विखे म्हणाले.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर ते ठाम आहेत असं त्यांनी म्हटलं यावर काँग्रेस किंवा शिवसेना यांनी आपली भूमिका मांडली नाही.
यावर बोलताना खासदार विखे म्हणाले की, 'काँग्रेस भूमिका कधी मांडू शकत नव्हती शिवसेनेकडे दोन आमदार राहिले आणि त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा काही विषयच राहिला नाही. विरोधी पक्ष नेत्यांना त्यांच्या भूमिकेवर ठाम राहावं वाटत असेल तर आम्ही त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आणि आमच्या भावना व्यक्त केल्या. आता ते जर म्हणत असतील की, त्यांच्या भूमिकेवर ते ठाम आहेत तर निश्चित जेवढे शिवभक्त असतील ते त्याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या पक्षाला होणारी हानी करून सिद्ध करून देईल' असं खासदार विखे म्हणाले.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत येऊन चित्रपट क्षेत्रातील कलाकारांशी बैठक केली यावरून फिल्म इंडस्ट्री उत्तर प्रदेशमध्ये जाईल या चर्चेला उधाण आले आहे यावर बोलताना खासदार विखे म्हणाले की, 'फिल्म इंडस्ट्री कोणी कुठेही पळून घेऊन जात नाही, अनेक चित्रपट निर्माते बाहेरच्या देशात जाऊन शूटिंग करतात मग काय ते तिकडेच स्थायिक होत नाही.
एखादा स्टुडिओ दुसऱ्या राज्यात उघडत असेल तर तिथे चित्रपटाचे शूटिंग करून ते कलाकार पुन्हा मुंबईत येतील त्यांची घरे मुंबईत आहेत. शेवटी त्यांनी केलेल्या व्यवसायातून सरकारला मिळालेलं उत्पन्न हे केंद्राच्या जीएसटीच्या माध्यमातून सरकारलाच मिळणार आहे. महाविकास आघाडीला कुठलेही प्रकारे काम नसल्यामुळे ते असे मुद्दे पुढे आणत आहेत' असं खासदार विखे म्हणाले. 'पळून जाऊन लग्न करण्यावर निर्बंध येण्यासाठी कायदा व्हावा' 'ज्या पद्धतीने नवी पिढी 18 वर्षाच्या पुढची सुशिक्षित मुल आणि मुली हे आपल्या आई-वडिलांच्या मनाविरोधात जाऊन पळून लग्न करायला लागलेले आहेत ही चिंतेची गोष्ट आहे.
नगर जिल्ह्यामध्ये महिन्याला जवळपास दीडशे केस अशा प्रकारच्या आढळून येतात आणि हा समाजाला एक फार मोठा धोका निर्माण झालेला आहे, असं माझं व्यक्तिगत मत आहे असं खासदार विखे म्हणाले. 'ज्या पद्धतीने समाजापुढे त्यांच्या वडिलांची प्रतिमा किंवा आईची प्रतिमा किंवा नातेवाईकांची प्रतिमा खराब होते हे मला वाटतं फार दुर्दैवी आहे. अशा प्रकारात सामाजिक तेढ निर्माण होईल आणि आई-वडिलांचा मुलांवर- मुलींवर आणि मुला-मुलींचा आई-वडिलांचा विश्वास कमी होत जाईल आणि हे भविष्याच्या दृष्टिकोनातून घातक आहे या दृष्टिकोनातून काहीतरी आळा या सगळ्या प्रकरणांमध्ये बसायला हवा त्यात लव्ह जिहाद हा एक त्यातील घातक प्रकार आहे. त्यामुळे पळून जाऊन लग्न करण्यावर निर्बंध आणण्यासाठी एखाद्या कायदा यावा अशी सगळ्यांची मागणी आहे, असंही खासदार विखे म्हणाले.
Tags :
606780
10