गंगामाई कारखाना - लेखी आश्वासनाने नवनाथ इसरवाडे यांचे उपोषण मागे
By Admin
गंगामाई कारखाना- लेखी आश्वासनाने नवनाथ इसरवाडे यांचे उपोषण मागे
गंगामाई कारखान्या विरोधात पाच दिवसापासुन चालु होते उपोषण
नगर सिटीझन live team-
शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष विनायकराव मेटे यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथील शिवसंग्राम पक्षाचे शेवगाव तालुका अध्यक्ष नवनाथ इसरवाडे यांनी दि.०८ मार्च रोजी गंगामाई साखर कारखान्या विरोधात शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांना लेखी निवेदन देऊन संपूर्ण मागण्या पूर्ण होईपर्यंत तहसीलदार कार्यलयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे लेखी निवेदनात नमूद केले होते. त्या अनुषंगाने नवनाथ इसरवाडे यांनी दि. १५ मार्च पासून शेवगाव तहसीलदार कार्यलयासमोर आमरण उपोषणास बसले होते परंतु तब्बल पाच दिवसाच्या कालावधी नंतर दि. १९ मार्च रोजी दुपारी गंगामाई साखर कारखान्याचे अधिकाऱ्यांच्या तसेच शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांच्या हस्ते दिलेल्या लेखी आश्वासनाने नवनाथ इसरवाडे यांचे आमरण उपोषण सोडण्यात आले असून गंगामाई साखर कारखाना प्रशासनाने दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, दि. १७ मार्च रोजी २० कोटी ३६ लाख रुपये ऊस पुरवठादार यांच्या बँक खाती वर्ग केलेले आहेत. त्याच बरोबर २२ कोटी ४३ लाख रुपये दि. २० मार्च पर्यंत ऊस पुरवठादार यांचे बँक खाती वर्ग करण्याचे नियोजन पूर्ण केलेली आहे. कारखान्याचे आज अखेर एकूण देय एफ.आर. पी. पैकी ७८.९० टक्के एफ. आर. पी. अदा केलेली आहे. तसेच उर्वरित देय ऊस पेमेंट ३७ कोटी ७६ लाख रुपये पैकी ५० टक्के रक्कम मार्च २०२१ अखेर बँक कामकाजाचे सोयीनुसार व उर्वरीत ५० टक्के रक्कम १० एप्रिल २०२१ अखेर अदा करता येईल यादृष्टीने फंड उपलब्ध करण्याचे काम तातडीने हाती घेत आहोत. फंड उपलब्ध झाल्याबरोबरच तातडीने वर नमूद बाकी ऊस उत्पादकाचे बँक खाती वर्ग करण्याचे नियोजन करत आहोत. याचबरोबर ऊस गाळपास आल्यापासून १४ दिवसापेक्षा विलंबाने अदा केलेल्या ऊस पेमेंट ( एफ.आर.पी. ) वरील विलंब कालावधीचे व्याजाची रक्कम मा. साखर आयुक्त यांचेमार्फत विषेश लेखा परिक्षक वर्ग १ ( साखर ) सहकारी संस्था अहमदनगर यांचेकडून गाळप हंगाम बंद झाल्यानंतर ऑडिट होऊन जी रक्कम देय असेल ती अदा करण्यास कारखाना बांधील राहील. यावेळी या आंदोलनास प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष संदिप बामदळे, संघर्ष महिला फौंडेशनचे संस्थापक, अध्यक्षा तारामती दिवटे, संजयजी पवार, सामाजिक कार्यकर्ते संजय राजेभोसले, वसंतराव गव्हाणे, डॉ महेमुद शेख यांच्यासह आदीं सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच विविध सामाजिक संघटनांनी सहकार्य केले आहे. तसेच गंगामाई साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व्ही. एस. खेडेकर, प्रशासकीय व्यवस्थापक ए. के. मुखेकर, मुख्य ऊस विकास अधिकारी व्ही. एस. शिंदे, कार्यालय अधीक्षक राजकुमार झिरपे यांनी सदरील उपोषण स्थळी येऊन कारखाना प्रशासनाच्या वतीने इसरवाडे यांच्या मागण्या संदर्भात लेखी आश्वासन दिले आहे.