भातकुडगाव फाटा येथे सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या साठी सुरू केलेल्या साखळी आंदोलनास वंचित बहुजन आघाडी च्या वतीने प्रा किसन चव्हाण यांनी दिला पाठिंबा
शेवगाव - प्रतिनिधी
महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केले आहे महाराष्ट्रभर या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गावोगाव प्रस्थापित पुढाऱ्यांना गावबंदी तसेच साखळी उपोषण मराठा समाजातील तरुणांनी सुरू केले आहे त्याचाच एक भाग म्हणून शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटा येथे दहिगावणे जिल्हा परिषद गटातील मराठा समाजातील तरुण कार्यकर्त्यांनी साखळी उपोषण सुरू करून आज पासून भायगाव चे विद्यमान सरपंच राजेंद्र आढाव व जोहरापूरचे माजी सरपंच अशोक देवडे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्याचे उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांनी उपस्थित राहून मराठा आरक्षणाला वंचित बहुजन आघाडीचा कालही ,आजही आणि उद्याही जाहीर पाठिंबा असणार आहे असे सांगितले यावेळी माजी जि प सभापती दिलीपराव लांडे पाटील, पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती गोकुळ दौंड, दहिगावने चे उपसरपंच राजेंद्र पाऊलबुद्धे, चेअरमन मरकड, तुकाराम शिंगटे , रामकिसन जाधव सुरेश घानमोडे, अण्णासाहेब गर्जे,हरिभाऊ पाठे, बाळासाहेब काळे, शहराम आगळे ,काळे सर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते