चंद्रशेखर घुले पाटील यांनी नेहमीच इतरांना मोठं केलं ; डाॕ.क्षितीज घुले यांची पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल
शेवगाव- प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी बिनविरोध झाल्याच्या पहिल्या दिवसापासून माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांचे नाव आघाडीवर होते .कारण की त्यांनी यादी जिल्हा बँकेचे अध्यक्षपद चांगल्या पद्धतीने हाताळणे होतो तसेच या आधीच्या संचालक मंडळात यांनी चांगले काम केले होते त्यामुळे त्यांची अध्यक्षपदी वर्णी लागणार याची जोरदार चर्चा सुरू होती.
पण काल अचानक शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी कडुन ॲड. उदय शेळके यांचे नाव पुढे आले व अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. अर्थात यासाठी घुले यांनीही संमती दिली व पक्षाचा आदेश मान्य केला.
यानंतर शेवगावचे सभापती क्षितीज घुले पाटील यांनी लिहीलेली फेसबुक पोस्ट घुले समर्थकांमध्ये चर्चेचा विषय ठरली .ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हारल होत आहे . क्षितीज घुले यांनी लिहिले आहे की,
मा. आ. चंद्रशेखर घुले पाटीलांनी ईतरांना मोठे केले असे हजारो उदाहरणे आज दिली तरी कमी पडेल. दुसर्याच्या मोठेपणात आपला मोठेपणा हाच भाऊंचा स्वभाव आज नगर जिल्ह्याने अनुभवला King is king