कवडदरा विद्यालयात देशपातळीवर निवड झालेल्या कुस्तीवीर बाळू जुंदरे याचा सत्कार
कवडदरा - प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील भारत सर्व सेवा संघाचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनियर काॕलेज मधील व
गुरु हनुमान आखाडा साकूरफाटा या आखाड्यातील कुस्तीपट्टू व भरविर खुर्दचा भूमिपुत्र पहिलवान बाळू शिवाजी जुंदरे याने
मामासाहेब मोहळ तालीमसंघ पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय सब ज्युनियर कुस्ती स्पर्धेतील
65 किलो वजनी गटात प्रतिस्पर्धी मल्लांना आस्मान दाखवत राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे.तसेच बाळूची 2ते4 एप्रिल 2021 रोजी नोएडा (उत्तरप्रदेश ) येथे होणार्या देश पातळीवरील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून शाळेचे व गावाचे नाव बाळूने देशपातळीवर चर्चेत आणले आहे.
कुस्ती या अस्सल देशी समजल्या जाणार्या क्रिडाप्रकारात कवडदरा विद्यालय तसेच भरविर खुर्द गांवचे नांव महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर अखिल भारतात पोहोचवणार्या पहिलवान बाळू जुंदरे विद्यालयात अभिनंदन तसेच सत्कार प्राचार्य कचेश्वर मोरे यांनी विद्यालयाच्या वतीने केला.यावेळी माजी सरपंच दत्तूभाऊ पाटील जूंदरे, सुभाषदादा फोकणे, इगतपुरी भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष
रमेशजी निसरड, युवा नेते संपतभाऊ रोंगटे,भाऊराव रोंगटे,किरण रोंगटे तसेच तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.