स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी वाटेतच अडवलं
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी स्वाभिमानीचे कार्यकर्ते मुळा धरणात जलसमाधी आंदोलन करणार होते.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जाणार होतं. पण त्यापुर्वीच पोलिसांनी रविंद्र मोरे यांच्यासह शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.
अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पण अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. राज्य सरकारकडून ही मदत मिळण्यासाठी स्वाभिमानीच्या वतीनं वारंवार मागणी करण्यात आली. अनेकदा निवदेने दिली, आंदोलनेही केली. पण राज्य सरकारने स्वाभिमानीच्या निवेदनाची, आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे 20 डिसेंबर पर्यंत सरकारने मदत दिली नाही तर 21 डिसेंबरला मुळा धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा स्वाभिमानीने दिला होता. जलसमाधीसाठी काही कार्यकर्ते मुळा धरणाजवळ पोहचले. पण पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतलं आहे.