महाराष्ट्र
Breaking- या गावात ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात भयभीत : जमिनीला भेगा; ओढ्यातील पाणीही अचानक आटले
By Admin
Breaking- या गावात ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात भयभीत : जमिनीला भेगा; ओढ्यातील पाणीही अचानक आटले
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
बुधवारी सकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यातील बोरबन (सराटी) टेकडवाडी येथे देविदास गाडेकर,अनिल गाडेकर,नवनाथ गाडेकर,शांताराम गाडेकर,शिवाजी गाडेकर,सोमनाथ गाडेकर,
अनंथा गाडेकर आदींसह ग्रामस्थ येथे राहतात. आजूबाजूला डोंगर व नदीपात्र काहीच अंतरावर आहे. या परिसरात ठिकठिकाणी जमिनीला भेगा पडल्या आहे. आज (बुधवारी ३० ) सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील बोरबन (सराटी) परिसरात टेकडवाडी लोक वस्तीवर जमिनीला अचानक भेगा पडल्याने येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
भेगा पडल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.भेगा पडलेल्या परिसरात असलेल्या कूपनलिकेचेही पाणी बंद झाले असल्याचे येथील ग्रामस्थ अनंथा गाडेकर यांचे म्हणणे आहे. याबाबत बोरबन
गावचे सरपंच संदेश गाडेकर यांनी प्रशासनाला कळविले आहे. तलाठी दादा शेख व कोतवाल शशिकांत खोंड यांनी घटनास्थळी भेट दिली. यापूर्वीही दोन वर्षापूर्वी सराटी लोकवस्ती पासून काही अंतरावर
असणाऱ्या करवंदवाडी येथील काळदरा ओढ्यातील खडकाला भेगा पडून ओढ्यातील पाणी अचानक आटले होते .
यासंबंधी तज्ज्ञांमार्फत तपासणी सुरू असून ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन संगमनेरचे तहसिलदार अमोल निकम यांनी केले आहे.
भूर्गभातील हालचाली सतत अनुभवायला येणाऱ्या या भागात बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. संगमनेर तालुक्यातील बोरबन, सराटी परिसरात टेकडवाडी वस्तीवर बुधवारी सकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे.
एका बाजूला डोंगर व दुसरीकडे नदीपात्र काही अंतरावर आहे. अशा ठिकाणी असलेल्या टेकडवाडी वस्तीजवळ या भेगा आढळून आल्या आहेत. बोरबन गावचे सरपंच संदेश गाडेकर यांनी प्रशासनाला याची माहिती दिली.
त्यानुसार तलाठी दादा शेख व कर्मचारी शशिकांत खोंड यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेची माहिती नाशिकच्या मेरी संस्थेला कळविली आहे.
भूजल सर्वेक्षण संस्थेच्या अधिकाऱ्यांशीही बोलणे झाले असून अधिकारी येथे पाहणी करणार आहेत, अशी माहिती संगमनेरचे तहसिलदार अमोल निकम यांनी दिली.
Tags :
42333
10