साडेआठ लाखांच्या दुचाकी जप्त करणाऱ्या तिघांच्या टोळीचा पर्दाफाश
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
मोटारसायकल चोरी करणाऱ्या तिघांच्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. ८ लाख ३० हजार रुपये किमतीच्या २० दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. गोविंद संजय शिंदे (रा.
बेट कोपरगाव), अशिष राममिलन कोहरी (रा. पुणतांबा चौफुली, कोपरगाव, मूळ रा. अमेठी, उत्तरप्रदेश) या दोघांना अटक करण्यात आली. तिसरा साथीदार नाना पानसरे हा फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
१९ मे रोजी बेट भागातून किशोर दिघे यांची दुचाकी चोरीला गेली होती. यार चोरीप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आर. पी. पुंड, जे. पी. तमनर, संभाजी शिंदे, राम खारतोडे, जी. व्ही. काकडे यांचे एक पथक तयार करून नाकाबंदी करत होते. गोविंद संजय शिंदे याच्याकडे चोरीची दुचाकी असून तो बेटनाका येथे थांबलेला आहे, असे पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत समजले. मिळालेल्या माहितीच्या आधारे चौकशी केली असता आरोपी शिंदे उडवाउडवीचे उत्तर देऊ लागला.
पोलिसांना संशय आल्याने त्यास
ताब्यात घेऊन मोटरसायकल बाबत विचारपूस केली. त्याची आणखी दोघांची नावे सांगून मोटारसायकल चोरी केल्याचे कबूल केले. दोन्ही आरोपींनी विविध ठिकाणाहून मोटारसायकल २० मोटारसायकल पोलिसांकडे सुपुर्द केल्या. ८ लाख ३० हजार रुपये किमतीच्या मोटारसायकल ताब्यात घेण्यात आल्या आहेत.