महाराष्ट्र
कासार पिंपळगाव गटात मोनाली राजळे विरुद्ध योगिता राजळे लढत होणार
By Admin
कासार पिंपळगाव गटात मोनाली राजळे विरुद्ध योगिता राजळे लढत होणार
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परीषद कासार पिंपळगाव गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने या गटात मोनाली राजळे विरूद्ध योगिता राजळे, अशी लढत होवू शकत असून, राजळे विरूद्ध राजळे एकमेकांसमोर उभे ठाकतील.
या गटात पूर्वी आमदार मोनिका राजळे यांचे दीर राहुल राजळे सदस्य म्हणून निवडणून आले होते. महिला आरक्षणामुळे आमदार राजळे यांच्या जाऊबाई मोनाली राजळे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.
पाच जिल्हा परिषदेच्या गटतील आरक्षणामुळे जिल्हा परिषदेच्या महिला सदस्यांच्या पतींना, तर पती सदस्य असलेल्या पत्नीला येणार्या निवडणुकीत अनुकूलता असणार आहे.
या गटात पूर्वी आमदार मोनिका राजळे यांचे दीर राहुल राजळे सदस्य म्हणून निवडून आले होते.तसेच यावेळी आ.राजळे यांचे चुलत दिर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवशंकर राजळे यांचा त्यांनी पराभव केला होता.
महिला आरक्षणामुळे आमदार राजळे यांच्या जाऊबाई कासार पिंपळगावच्या विद्यमान सरपंच सौ. मोनाली राजळे भाजप च्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.तसेच त्याच्या चुलत जाऊबाई माजी जिल्हा परीषद सदस्य सौ. योगिता राजळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवडणूक लढवतील असे चिञ दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे हे गटातील गावातील नागरिकांशी संपर्कात असताना लोकांच्या सुख दुःखात सहभागी होतात.तसेच अनेकदा गटातील लोकाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
आ.मोनिका राजळे यांचे गटात घनिष्ठ संबंध असून आमदार निधीतून विविध योजना गटामध्ये आणलेल्या आहेत.तसेच विकास कामे होत आहेत.
जिल्हा परीषद निवडणूक येत्या पाच वर्षात झालेल्या गटात झालेली विकास कामे, तसेच जि.प. सदस्य यांचा गावागावातील लोकांशी असलेले संबंध,नातेवाईक यावर निवडणूक अवलंबून आहे.काही दिवसापुर्वी जि.प. गटातील गावात सोसायटी निवडणूका झाल्या आहेत. यामध्ये भाजपच्या आ.मोनिका राजळे यांनी सोसायटी मध्ये वर्चस्व मिळवले असले तरी काही गावातील सोसायटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप ढाकणे गटाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.याचा फायदा यांच्या पक्षातील योगिता शिव शंकर राजळे यांना होवू शकतो. गटातील बहुतेक गावामध्ये जिल्हा परीषदेच्या माध्यमातून विकास झाले असले तरी काही गावात विकास कामे बाकी आहेत. गटामध्ये पंचायत समितीचे दोन गण असून कासार पिंपळगाव गण व कोरडगाव गण आहेत. यासाठी चे आरक्षण ही सर्व साधारण महीलासाठी राखीव आहे.
यासाठी कासार पिंपळगाव गणात भाजपकडून माजी पंचायत समिती सदस्य विष्णूपंत अकोलकर आपल्या पत्नी किंवा सून तसेच कोरडगाव गटात माजी सभापती सुनिता गोकुळ दौंड निवडणूक साठी इच्छूक आहेत.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवडणूक लढवण्यासाठी नवीन उमेदवार निवडूनसाठी इच्छूक आहेत.परंतु अद्याप चिञ स्पष्ट झालेले नाही.गटात शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी,स्वाभिमानी मराठा महासंघ, पक्षातून उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरही निवडणूक लढवतील असे चिञ दिसते.
एकूणच भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अशीच लढत पहायला मिळणार आहे.
Tags :
110972
10